मुंबई: पुढच्या पाच वर्षांसाठी IPL च्या प्रसारण अधिकारासंदर्भात मोठी डील झाली आहे. या डीलची रक्कम 44 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. टीवी राइट्सचे अधिकार ‘डिज्नी स्टार’ ने (disney star) मिळवले आहेत, तर डिजिटल राइट्स ‘Viacom 18‘ ने मिळवलेत. यावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. डिज्नी स्टारने टीवी राइट्स 23,575 कोटी रुपयांमध्ये तर Viacom 18 ने डिजिटल राइट्स 20,500 कोटी रुपयांमध्ये मिळवले आहेत. 44075 कोटी रुपयांमध्ये 2023 ते 2027 साठी IPL च्या टीवी आणि डिजिटल राइट्सची डील झाली आहे. एकूण 410 सामन्यासाठी एवढी मोठी रक्तकम मोजण्यात आली आहे. त्या शिवाय पॅकेज सी साठीची डील 1813 कोटी रुपयांमध्ये फायनल झाल्याची माहिती आहे. पॅकेज सी चा संबंध प्लेऑफ सामन्यांशी आहे, तेच पॅकेज डी ची डील अजून बाकी आहे.
IPL Media Rights साठी रविवारपासून लिलाव सुरु आहे. पहिल्यादिवशी पॅकेज ए आणि बी साठी म्हणजे टीवी आणि डिजिटल प्रसारणासाठी बोली लावली गेली. पहिल्याच दिवशी आकडा 43,000 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. दुसऱ्यादिवशी 44 हजार कोटींच्या पुढे डील डन झाली. म्हणजे आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी मीडिया राइट्सची किंमत 107 कोटींच्या घरात गेली. या व्यवहारामुळे IPL जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स लीग बनली आहे.
2023 ते 27 IPL मीडिया राइट्सवर बोली लावण्यामध्ये सोनी, डिज्नी स्टार, झी आणि रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्या सहभागी होत्या. काही कंपन्यांनी टीवी आणि डिजिटल राइट्स दोन्हींसाठी बोली लावली. काहींनी फक्त डिजिटल राइट्सवर लक्ष केंद्रीत केलं.
पुढच्या पाच वर्षांसाठी IPL मीडिया राइट्सची चार पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांची बेस प्राइस निर्धारित करण्यात आली होती. मीडिया राइट्सची बेस प्राइस 32 हजार कोटी रुपये होती. पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्सची बेस प्राइस 49 कोटी रुपये होती. पॅकेज बी डिजिटल राइट्सची बेस प्राइस 33 कोटी रुपये होती. पॅकेज सी ची बेस प्राइस 11 कोटी आणि पॅकेज डी ची बेस प्राइस 3 कोटी रुपये होती.