दुबई, दि.19 डिसेंबर | आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी ऑक्शन दुबईमध्ये पार पडणार आहे. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी खेळाडूंचा लिलावास सुरुवात होणार आहे. आयपीएलचे संघ 262 कोटी रुपये खेळाडूंवर उधळणार आहेत. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास सर्वात महाग ठरणारे खेळाडू आयपीएलमध्ये यशस्वी झाले नाहीत. आता 2025 च्या हंगामासाठी कोणता खेळाडू सर्वात महाग ठरणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असताना आतापर्यंतचा इतिहास लक्षात घ्यावा लागणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 हजार 166 खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती.आयपीएल मिनी ऑक्सनसाठी यंदाही 15-16 कोटी रुपयांची बोली लागण्याची शक्यता आहे. यंदा दहा फ्रॅचायजींकडे 77 खेळाडूंचे स्लॉट रिकामे आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागणार आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला 2023 मध्ये पंजाब किंग्सने 18.5 कोटी रुपयांत घेतले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग बोली ही होती. परंतु सॅम अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. 14 सामन्यांत 276 धावा त्याने केले. गोलंदाजीत केवळ 10 विकेट घेतल्या. त्यासाठी सरासरी 10.76 धावा दिल्या.
मागील ऑक्शनमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटींत घेतले. परंतु तो फक्त एकच सामना खेळू शकला. जखमी झाल्यामुळे पूर्ण हंगामात तो बाहेर होतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मौरिस याला 2021 च्या सीजनसाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटीत घेतले होते. त्याने 15 विकेट घेतल्या तरी सरासरी 9.17 धावा दिल्या. तो केवळ 67 धावाच बनवू शकला.
टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याला 2015 मधील ऑक्शनमध्ये दिल्लीने 16 कोटींत घेतले होते. परंतु तोही अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. त्याने केवळ 248 धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडू कैमरन ग्रीन यालाही मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींत घेतले होते. परंतु 16 सामन्यात 160 च्या स्ट्राइक रेटने 452 धावाच तो करु शकला. तसेच सहा विकेट घेतल्या होत्या.