IPL 2022 | खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली? नव्या संघांसाठी खास नियम! जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Oct 29, 2021 | 12:15 PM

नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत.

IPL 2022 | खेळाडूंच्या लिलावाची तारीख ठरली? नव्या संघांसाठी खास नियम! जाणून घ्या सर्वकाही
IPL
Follow us on

दुबई : कोरोनाचा शिरकाव त्यामुळे एकीकडे स्थगिती, मग स्पर्धेचं ठिकाण बदलत अखेर आयपीएल 2021 (IPL2021) पार पडली. त्यानंतर आता टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली आहे. पण सोबतच आगामी आयपीएल अर्थात IPL 2022 संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. यावेळी आयपीएलमध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणाही काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाल्यानंतर आता खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडण्यापूर्वी आणखी काही महत्त्वाचे नियम समोर आले आहेत. (Ipl next season mega auction will take place in January 2022)

नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत. InsideSport.in च्या रिपोर्टनुसार, IPL गव्हर्निंग काऊन्सिलच्या एका सदस्याने सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो. त्याच वेळी, विद्यमान आठ फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी डिसेंबरमध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे सादर करण्यास सांगितले जाईल. यंदा संघाना 90 कोटी रुपये घेऊन खेळाडू विकत घेता येणार आहेत. मागील वर्षी ही किंमत 85 कोटी इतकी होती.

वेबसाइटने आपल्या अहवालात जीसी सदस्याचा हवाला दिला आहे. “पुढील सात-आठ दिवसांत, पुढच्या सीझनशी संबंधित सर्व डेटलाइन प्रसिद्ध होतील. आम्ही कायम ठेवलेल्या खेळाडूंबाबत सर्व फ्रँचायझींशी अनौपचारिकपणे बोललो आहोत. खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत, ऑक्शन पर्स, लिलावाची तारीख पुढील काही दिवसांत ठरवली जाईल आणि फ्रँचायझींना कळवण्यात येईल.”

परदेशी खेळाडूंचं काय?

या नव्याने जाहीर केलेल्या नियमांनुसार आयपीएलमध्ये सध्या खेळत असलेले 8 संघ हे संघात ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये 4 खेळाडूंपैकी 3 भारतीय 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी असंही संयोजन वापरु शकतात. तर नव्या संघासाठी 3 पैकी 2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू घेण्याचा नियम करण्यात आला आहे.

12 हजार कोटींच्या घरात नव्या दोन्ही संघाची किंमत

दुबईमध्ये झालेल्या नव्या संघाच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.

इतर बातम्या

Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?

T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर

(Ipl next season mega auction will take place in January 2022)