मुंबई: दमदार प्रदर्शनासह गुजरात टायटन्सचा संघ आयपीएल पॉइंटस टेबलमध्ये (IPL points Table) अव्वल स्थानावर आहे. पण प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी अन्य संघांमध्ये चुरशीचा सामना सुरु आहे. गुरुवारी आयपीएलमधला 41 वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सीजनमध्ये कोलकाता नाइट राडयर्सला (DC vs KKR) दुसऱ्यांदा नमवलं. या विजयासह दिल्लीच्या संघाची पॉइंटस टेबलमध्ये स्थिती थोडी सुधारली आहे. कोलकातावरील विजयासह दिल्लीचे पॉइंटस टेबलमध्ये आठ गुण झाले आहेत. ते सहाव्या स्थानावर आहेत. सलग पाचव्या पराभवासह केकेआरची स्थिती आणखी खराब झाली आहे. केकेआरकडून खेळणारा कुलदीप यादव (Kuldeep yadav) आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. कालच्या सामन्यात कोलकाताच्या पराभवात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तीन ओव्हर्समध्ये 14 रन्स देत त्याने चार विकेट घेतल्या. कोलकाताच कबंरड मोडून टाकलं.
दिल्लीला विजयासाठी फक्त 147 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागला. अखेर 19 व्या षटकात रोव्हमॅन पॉवेलने षटकार खेचून दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या विजयासह दिल्लीचे आठ सामन्यात चार विजयासह आठ पॉइंटस झाले आहेत. त्यांनी सातव्या स्थानावरुन एक पाऊल पुढे टाकलं आहे. पंजाब किंग्सला मागे सोडून दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीसाठी एक चांगली बाब म्हणजे त्यांचा नेट रनरेट चांगला आहे. म्हणजे अजून एक विजय मिळवल्यास, समान पॉइंटस असलेल्या संघांपेक्षा ते अजून वरच्या पायरीवर जातील. या विजयामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. त्यांना उर्वरित सहा पैकी 4 सामने जिंकावेच लागतील. 16 पॉइंटस मिळाल्यास प्लेऑफमध्ये स्थान निश्चित होते.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
सलग पाचव्या पराभवामुळे कोलकाताची स्थिती आणखी खराब झालीय. 9 पैकी सहा सामन्यात त्यांचा पराभव झालाय. फक्त तीन मॅचमध्ये विजय मिळाला आहे. टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पहिल्या स्थानावर असलेला हा संघ आता आठव्या नंबरवर आहे. त्यांच्याकडे फक्त सहा पॉइंटस असून नेट रनरेटही पडलेला आहे. कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावेच लागतील.