मुंबई: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (LSG vs KKR) आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सामना झाला. आयपीएलमधला (IPL) हा 53 वा सामना होता. लखनौने ही मॅच तब्बल 75 धावांनी जिंकली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना सात बाद 176 धावा केल्या होत्या. कोलकाताला विजयासाठी 177 धावांचे टार्गेट होते. पण कोलकाताचा डाव 101 धावात आटोपला. आवेश खान (Avesh Khan) आणि जेसन होल्डर यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. केकेआरकडून फक्त आंद्रे रसेलने सर्वाधिक 45 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरेल. रसेलने आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 45 धावा फटकावताना तीन चौकार आणि पाच षटकार तडकावले. पण रसेल वगळता अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरेल. या पराभवामुळे कोलकाताचा पुढचा मार्ग बिकट झाला आहे.
We’re on a mission. Exceptional performance by the #SuperGiants!⁰#AbApniBaariHai?#IPL2022 ? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL @My11Circle pic.twitter.com/jdx7rBrPHH
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 7, 2022
केकेआरला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. कारण पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ 10 सामन्यात चार विजय आणि सहा पराभवासह आठव्या स्थानावर होता. प्लेऑफचं आव्हान टिकवून ठेवण्य़ासाठी केकेआरला विजय मिळवणं आवश्यकच होतं. तत्पूर्वी लखनौकडून सलामीवीर क्विंटन डि कॉकने 29 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. राहुल आऊट झाल्यानंतर डि कॉकने ऑलराऊंडर दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. डि कॉकला सुनील नरेनने शिवम मावी करवी झेलबाद केलं. दीपक हुड्डानेही चांगली फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 41 धावा करताना चार चौकार आणि दोन षटकार लगावले. कृणाल पंड्या (25), आयुष बदोनी नाबाद (15) आणि मार्कस स्टॉयनिसने 14 चेंडूत (28) धावा केल्या. स्टॉयनिसने अखेरीस फटकेबाजी केली. त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. त्यामुळे लखनौने निर्धारित 20 षटकात सात बाद 176 धावा केल्या.
आंद्रे रसेलचा धमाका 19 बॉल 45 रन्स, 3 फोर, 5 SIX चुकवू नका, क्लिक करुन पहा
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
केकेआरला हरवल्यामुळे पॉइंटस टेबलमध्ये लखनौची टीम पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे समान 16 गुण आहेत. पण सरस धावगतीमुळे गुजरातला मागे टाकून लखनौचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला नमवलं. त्यामुळे राजस्थानच्या खात्यात दोन गुण जमा झाले. पण ते तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनौ, गुजरात आणि राजस्थान यांचं स्थान सुरक्षित असून आता चौथ्या स्थानासाठी RCB, दिल्ली कॅपिटल्स आणि एसआरएचमध्ये संघर्ष अजून तीव्र होईल. पंजाब किंग्स सातव्या तर केकेआर आठव्या स्थानावर आहे.