मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (PBKS vs DC) सामना झाला. IPL 2022 मधला हा 64 वा सामना होता. प्लेऑफमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. दिल्लीने ही लढत 17 धावांनी जिंकली. दिल्लीच्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने नर्धारित 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) धडाकेबाज सुरुवात केली होती. पण नॉर्खियाच्या गोलंदाजीवर 28 धावांवर अक्षर पटेलकडे झेल देऊन तो तंबूत परतला. शिखर धवनला 19 धावांवर शार्दुल ठाकूरने ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. भानुका राजपक्षेच्या रुपाने पंजाबची दुसरी विकेट गेली. त्यावेळी पंजाबची धावसंख्या 53 होती.
पण त्यानंतर 14 धावात पंजाबच्या झटपट पाच विकेट गेल्या. पंजाबचा डाव लवकर आटोपतो की, काय असं वाटत होतं. पण जितेश शर्माने झुंज दिली. तो खेळपट्टीवर असे पर्यंत पंजाबचा संघ सामना जिंकेल असं वाटत होतं. पण शादुर्ल ठाकूरने 44 धावांवर वॉर्नरकरवी त्याला झेलबाद केलं. त्यानंतर पंजाबचा संघ सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये दिसलाच नाही. मधल्या षटकात कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने आज चार विकेट काढल्या.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
दिल्लीच्या विजयामुळे पॉइंटस टेबलच समीकरण पुन्हा एकदा बदललं आहे. आरसीबीला हटवून दिल्लीचा संघ आता चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोन्ही टीम्सचे 14 पॉइंटस आहे. पण दिल्लीचा रनरेट बँगलोरपेक्षा चांगला आहे. पंजाबचा पुढचा मार्ग आता खडतर झाला आहे. आता SRH आणि मुंबईचे फक्त दोन सामने बाकी आहेत. बाकी सर्व संघाचा फक्त एक सामना उरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स विरुद्धचा आणि आरसीबीने गुजरात टायटन्स विरुद्ध सामना जिंकला, तर दोन्ही टीम्सचे 16 पॉइंट्स होतील. अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारावर जो सरस असेल, तो संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होईल. लखनौ आणि राजस्थान रॉयल्सचे 16 पॉइंटस आहेत. आता प्रत्येक संघासाठी पुढचा सामना करो या मरोच असेल.