मुंबई: IPL 2022 स्पर्धेचा आता दुसरा टप्पा सुरु असून दिवसेंदिवस ही स्पर्धा अधिकच रंगतदार होत चालली आहे. आयपीएलमध्ये (IPL) एका संघाचा विजय कधीही दुसऱ्या टीमचं गणित बिघडवू शकतो. आता हैदराबादच्या बाबतीत हेच घडलं आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (CSK vs RCB) विजय मिळवला. त्याचा फटका सनरायजर्स हैदराबाद संघाला बसला आहे. काल पुण्यात झालेल्या सामन्यात चेन्नईला RCB ला हरवलं. पण त्याचवेळी पॉइंटस टेबलमध्ये SRH च स्थानही हलवून टाकलं. RCB च्या विजयामुळे टॉप फोर टीम्सच समीकरण बदलून गेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चेन्नईला हरवून स्वत:साठी संजीवनी शोधली. या विजयाबरोबर त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीत स्वत: स्थानही बळकट केलं आहे. पॉइंटस टेबलमध्ये टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी RCB ची टीम यशस्वी ठरली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ चेन्नई सुपर किंग्सला हरवून पॉइंटस टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. चार नंबरच्या पोझिशनवर आधी सनरायजर्स हैदराबादचा संघ होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यात सहा मॅचेस जिंकल्यात, तर पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. RCB चे आता एकूण 12 पॉइंटस आहेत.
याआधी सनरायजर्स हैदराबादचा संघ 10 पॉइंटससह चौथ्या स्थानावर होता. चौथ्या वरुन पाचव्या नंबरवर घसरल्यानंतरही SRH साठी एक गोष्ट चांगली आहे. त्यांनी आरसीबीच्या तुलनेत दोन सामने कमी खेळलेत. आतापर्यंत ते 9 सामने खेळले आहेत. यात पाच विजय आणि चार पराभवांचा सामना केला आहे.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
बँगलोरकडून पराभूत झाल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा मार्गही खडतर बनला आहे. चुंबकासारखे ते पॉइंटस टेबलमध्ये 9 व्या स्थानाला चिकटले आहेत. 10 पैकी CSK ने फक्त तीन मॅच जिंकल्यात. बँगलोर विरुद्धचा त्यांचा सातवा पराभव आहे. पॉइंटस टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर दोन नवीन संघ आहेत. गुजरात टायटन्स पहिल्या तर लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.