Csk Retained Players : चेन्नई सुपर किंग्जकडून हे खेळाडू रिटेन, तब्बल 18 खेळाडू रिलीज

| Updated on: Nov 30, 2021 | 8:47 PM

भारताचा पूर्व कर्णधार, सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीची ओळख आहे. त्याचा हाच दबदबा आयपीएलमध्येही दिसून येतो. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीला रिटेन केलं आहे.

Csk Retained Players : चेन्नई सुपर किंग्जकडून हे खेळाडू रिटेन, तब्बल 18 खेळाडू रिलीज
ms dhoni
Follow us on

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जकडून काही दिग्गज खेळाडुंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत कोण दिसणार आणि कोण नाही? हे जाणून घेण्यासाठी चेन्नईचे फॅन्स उतवळे झाले आहेत. चेन्नईने काही दिग्गज खेळाडुंना रिटेन करत अनेक खेळाडुंना रिलीज केलं आहे. त्यात चेन्नईसाठी अनेक सीझन महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या काही खेळाडुंचा समावेश आहे. यंदाच्या आयपीलसाठी चेन्नईची टीम जोमान मैदानात उतरणार आहे.

एम. एस. धोनी, जडेजा रिटेन

भारताचा पूर्व कर्णधार, सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीची ओळख आहे. त्याचा हाच दबदबा आयपीएलमध्येही दिसून येतो. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीला रिटेन केलं आहे. तर त्याचबरोबर भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये चन्नईसाठी महत्वाची भूमिका निभावणारा ऑल राऊंडर रविंद्र जडेजालाही चेन्नईने रिटेन केलं आहे. गेल्या आयपीएलमध्ये एक नाव खूप गाजलं ते म्हणजे ऋतुराज गायकवाडचं, त्यानं आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करत गोलंदाजांच्या तोडाला फेस आणला होता. त्यामुळे यंदाही ऋतुराज गायकवाडला चेन्नईने रिटेन केलं आहे.

रैनासह हे खेळाडू चेन्नईकडून रिलीज

सीएसकेने सुरेश रैना, फाफ डुप्लेसी, एन जगदीशन, अंबाती रायडू, सॅम करन, जोश हेजलवूड, लुंगी एनगिडी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा, सी हरि निशांत, आर साई किशोर, मिचेल सैंटनर, इमरान ताहिर, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा अशा दिग्गज खेळाडुंना रिलीज केले आहे. त्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये यंदा बरेच नवे चेहरे दिसणार असल्याचं  जवळपास स्पष्ट झालं आहे.

 

ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये बैठक; कुठलीही राजकीय चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची माहिती

PL 2022 Retention: रिटेन नाही झाला तरी मिळणार 20 कोटींपर्यंत रक्कम, या खेळाडूला रिटेन न झाल्याचा मोठा फायदा

ओमिक्रॉनमुळे यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नका, रामदास आठवले यांची आवाहन