मुंबई: भारताची महान क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिने क्रिकेटच्या जगात अनेक मोठमोठे रेकॉर्ड स्वत:च्या नावे केले आहेत. अनेक असेही रेकॉर्ड आहेत जे तोडणं सहजासहजी अजिबात शक्य नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मितालीच्या बॅटमधून अनेक रेकॉर्ड्स निघाले आहेत. पण यातीलच एक रेकॉर्ड आता एका दुसऱ्या महिला क्रिकेटपटूने तोडला आहे. आयर्लंडच्या एका 16 वर्षीय युवा खेळाडूने मितालीचा 22 वर्षीय जुना रेकॉर्ड तोडला आहे.
1999 साली मितालीने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मिल्टन कीन्स येथे आयर्लंडविरुद्ध मितालीने तिचा सलामीचा सामना खेळला. ज्यात तिने नाबाद 114 धावा ठोकतं सर्वात कमी वयात अर्थात 16 साल, 205 दिवसांची असताना शतक ठोकण्याचा पराक्रम केला. दरम्यान 22 वर्षानंतर आयर्लंडच्याच एमी हंटर या युवा खेळाडूने शतक ठोकत हा रेक़ॉर्ड तोडला आहे.
आयर्लंडची युवा स्टार क्रिकेटपटू एमी हंटरने झिम्बाब्वेच्या महिला संघाविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकीय डाव खेळला. दोन्ही संघामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात एमिलीने 121 धावा ठोकल्या. या शतकासोबतच तिने 22 वर्ष जुना मिताली राजचा रेकॉर्ड मोडिस काढला.
Take a bow Amy Hunter. ?
With her maiden Hundred in international cricket, she becomes the youngest ever centurion in Women’s one-day international cricket at just 16 years old today. ?☘️?@HanleyEnergy | #BackingGreen pic.twitter.com/1QygmtU1mu
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) October 11, 2021
मिताली राज ही काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर रचनारी खेळाडू ठरली होती. याआधी केवळ भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या मितालीने आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेेळाडू ठरली आहे. 38 वर्षीय मितालीने 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार 337 धावा करत इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड तोडले आहे. एडवर्ड्सने 10 हजार 273 रन केले आहेत.
हे ही वाचा-
IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास
IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी
(Irelands 16 year old amy hunter breaks mithali raj record of youngest ever centurion in women cricket)