Irfan Pathan विस्तारा एयरलाइन्सवर का भडकला?

| Updated on: Aug 25, 2022 | 12:32 PM

भारताचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठान (Irfan pathan) विस्तारा एयरलाइन्सवर (Vistara Airlines) प्रचंड संतापला आहे.

Irfan Pathan विस्तारा एयरलाइन्सवर का भडकला?
irfan pathan family
Follow us on

मुंबई: भारताचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठान (Irfan pathan) विस्तारा एयरलाइन्सवर (Vistara Airlines) प्रचंड संतापला आहे. सोशल मीडियावरुन (Social Media) त्याने आपला संताप व्यक्त केला. इरफानने पत्नी आणि मुलांसोबत विस्तारा एयरलाइन्सने प्रवास केला. त्यावेळी एयरलाइन्सकडून खूप कठोर वागणूक मिळाल्याची तक्रार इरफानने केली आहे. विस्तारा एयरआइन्सकडून मिळालेल्या वागणुकीमुळे कुटुंबासह प्रवाशांना त्रास झाल्याचा आरोप त्याने केला. इरफान पठानने विस्तारा एयरलाइन्सवर कारवाईची मागणी केली आहे.

इरफानने ट्विटर वरुन व्यक्त केला संताप

“मी विस्ताराच्या फ्लाइट यूके-201 ने मुंबईवरुन दुबईला जात होतो. चेक-इन काऊंटवर मला खूप वाईट अनुभव आला. माझी कन्फर्म बुकिंग होती. पण चुकून ते माझं तिकीट डाऊनग्रेड क्लास करत होते. मला त्यासाठी काऊंटरवर दीडतास वाट पहावी लागली. माझ्या सोबत पत्नी, आठ महिन्याचा माझं बाळ आणि पाच वर्षांचा मुलगा होता” असं इरफानने सांगितलं.

इरफानने आरोपांमध्ये काय म्हटलय?

“ग्राऊंड स्टाफने खूप निष्ठुर वागणूक दिली. ते फक्त कारण देत होते. त्यांनी फ्लाइटला ओव्हरसोल्ड का केलं? ते समजलं नाही. मॅनेजमेंटने याला कशी मंजुरी दिली. अजून कोणावर अशा अनुभवातून जाण्यााची वेळी येऊ नये, यासाठी लवकरात लवकर कारवाई करा, अशी माझी संबंधित यंत्रणांना विनंती आहे” असं इरफानने त्याच्या टि्वट मध्ये लिहिलं आहे.

विस्ताराने माफी मागितली

इरफानच्या तक्रारीनंतर विस्तारा एयरलाइन्सने तात्काळ पावल उचलली व टि्वट करुन उत्तर दिलं. त्यांनी इरफान पठानची माफी मागितली असून या घटनेबद्दल अजून माहिती मागितली आहे. “मिस्टर पठान, तुम्हाला जो अनुभव आला, त्या बद्दल आम्हाला खेद वाटतो. आम्ही याची चौकशी करु. तुम्ही तुमच्या प्रवासाची आम्हाला माहिती द्या, जेणेकरुन आम्हाला तुमच्याशी बोलता येईल” असं विस्ताराने आपल्या टि्वट मध्ये म्हटलं आहे.

इरफान पठान दुबईला का गेला?

27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा सुरु होत आहे. इरफान पठान स्पर्धेचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री टीमचा भाग आहे. भारताच्या सामन्याच्यावेळी इरफान हिंदी मध्ये कॉमेंट्री करताना दिसेल. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध आहे.