Hardik Pandya : हार्दिक पांड्यासंदर्भात इरफान पठाणचा हैराण करणारा मोठा दावा

| Updated on: May 04, 2024 | 2:40 PM

Hardik Pandya : IPL 2024 च नाही, त्या आधीपासून इरफान पठाण हार्दिक पांड्याला लक्ष्य करत आलाय. मुंबई इंडियन्सचा काल केकेआर विरुद्ध पराभव झाला. मुंबई इंडियन्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. त्यानंतर इरफान पठाणने हार्दिक पांड्या संदर्भात मोठा दावा केलाय.

Hardik Pandya : हार्दिक पांड्यासंदर्भात इरफान पठाणचा हैराण करणारा मोठा दावा
Hardik Pandya
Image Credit source: PTI
Follow us on

कोलकाता नाइट रायडर्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध 2012 पासून विजयाची प्रतिक्षा होती. शुक्रवारी ही प्रतिक्षा संपली. केकेआरने MI ला 12 वर्षानंतर त्यांच्या घरच्या मैदानात 24 धावांनी हरवलं. वेंकटेश अय्यर, मनीष पांडे आणि मिचेल स्टार्क या विजयाचे हिरो ठरले. एकवेळ केकेआरने 57 रन्सवर 5 विकेट गमावलेले. त्यांचा संघर्ष सुरु होता. त्यावेळी वेंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांनी डाव सावरला. दोघांच्या शानदार भागीदारीच्या बळावर केकेआर टीमने 169 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या मुंबईच्या टीमने फक्त 145 धावा केल्या. माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने मुंबई इंडियन्सच्या या पराभवासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार ठरवलय. त्याने पांड्याच्या कॅप्टनशिपवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय चुकीचा होता, असं इरफान पठाणने म्हटलं. क्रिकेटमध्ये कॅप्टनचा रोल महत्त्वाचा असतो. “पांड्याच्या नेतृत्वात अनेक समस्या आहेत. MI ची टीम कागदावर खूप मजबूत दिसते. पण व्यवस्थापन योग्य होत नाहीय. हार्दिकचे निर्णय कोणाला समजत नाहीयत” असं इरफान म्हणाला. “एकवेळ कोलकाताचे 5 विकेट पडले होते. पार्ट टाइम स्पिनर नमन धीरला 3 ओव्हर गोलंदाजी देण्याचा चुकीचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरची पार्ट्नरशिप झाली आणि लवकर ऑलआऊट करण्याची संधी MI ने गमावली. पठाणच्या मते हार्दिकने नमन धीर ऐवजी टीमच्या मुख्य गोलंदाजांकडे चेंडू सोपवायला हवा होता” असं इरफानला वाटतं.


हार्दिक पांड्याबाबत इरफान पठाणचा दावा काय?

“हार्दिक पांड्या पहिल्यापासून चुका करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली टीम एकजुटीने खेळत नाहीय, ही एक मोठी समस्या आहे. कॅप्टनला सर्व खेळाडूंनी स्वीकारल पाहिजे. पांड्याबाबत असं होताना दिसत नाहीय. त्यामुळे IPL 2024 मध्ये टीमची स्थिती खराब आहे” असं इरफान पठाण म्हणाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खराब प्रदर्शन केलय. 11 पैकी 8 सामने गमावून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारी मुंबई इंडियन्स पहिली टीम ठरलीय. हार्दिक पांड्याने स्वत: 11 सामन्यात 197 धावा केल्या आहेत.