IND vs AUS Final | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने होते. 1 लाख 30 हजार या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता आहे. वर्ल्ड कपची फायनल भारतात होत असल्याने अपेक्षा होती की, टीम इंडियाला फुल सपोर्ट असेल. आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यात प्रेक्षक कुठलीही कसर ठेवणार नाहीत, अशी अपेक्षा होती. फायनल मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर निळा समुद्र अवतरला होता. हे दृश्य पाहून ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनच्या मनातही धाकधूक वाढली होती. पण स्टेडियममध्ये इतके सारे प्रेक्षक असूनही ऑस्ट्रेलियाच काम सोपं झालं का?. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जे प्रेक्षक होते, त्यांच्यामुळे टीम इंडियाने सामना गमावला का?
हा प्रश्न आम्ही विचारलेला नाहीय. वर्ल्ड कप 2023 च्या पराभवानंतर सोशल मीडियावर ही चर्चा सुरु आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर साध्या सरळ स्वभावाच्या अहमदाबादच्या प्रेक्षकांवर निशाणा साधला जात आहे. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवाला अहमदाबादच्या प्रेक्षकांशी जोडलं जात आहे. त्याच एक कारण ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स सुद्धा आहे.
असं काय घडलं की….
तुम्हा विचार करत असाल, अहमदाबादच्या प्रेक्षकांनी अशी चूक काय केली?. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर असं काय घडलं की, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला? ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सचा आनंद गगनात मावत नव्हता. या सगळ्या प्रश्नांची उत्तर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या आवाजाशी संबंधित आहेत. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा जसा आवाज, गोंगाट दिसायला पाहिजे होता, तसा दिसला नाही अशीही सोशल मीडियावर चर्चा आहे.
त्यापेक्षा वेगळं चित्र
प्रेक्षकांचा आवाज नाही म्हणजे टीमला सपोर्ट नाही, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठ क्रिकेट मैदान आहे. सगळ स्टेडियम निळी जर्सी परिधान केलेल्या भारतीय फॅन्सनी भरलेलं होतं. असं म्हटलं जातय की, जेव्हा टीम इंडियाला सपोर्टची गरज होती. तेव्हा हे स्टेडियम शांत होतं. सन्नाटा होता. आवाज जसा असायला पाहिजे होता, त्यापेक्षा वेगळं चित्र होतं.
पॅट कमिन्सने काय मान्य केलं?
ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स म्हणाला की, “मी जेव्हा स्टेडियममध्ये आलो, तेव्हा निळा सागर पाहून थोडा नव्हर्स होतो. 1 लाख 30 हजार भारतीयांना निळ्या जर्सीमध्ये पाहण हा क्षण कधीही विसरता येणार नाही. पण एक चांगली बाब म्हणजे त्यांनी गोंगाट केला नाही”
सोशल मीडियावर जी चर्चा आहे, त्यातून अहमदाबाच्या प्रेक्षकांना पराभवासाठी जबाबदार धरलं जातय. यापेक्षा फायनलचा सामना मुंबई, चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुला खेळवला असता, तर बर झालं असतं, असही म्हटलं जातय.