IPL मुळे भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी होत आहे का?

| Updated on: Apr 20, 2024 | 8:05 PM

टीम इंडियाला आयपीएल सुरु झाल्यानंतर एकही वेळा टी२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. आयपीएलमधून अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळत असली तरी त्यांचा टीम इंडियाला कोणताही फायदा होताना दिसत नाहीये. भारतीय संघ कुठे कमी पडतोय.

IPL मुळे भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी होत आहे का?
ipl
Follow us on

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लीग आहे. ही लीग आता सर्वात मोठी बिझनेस आयडिया बनली आहे. सध्या आयपीएलचा १७वा सीझन सुरु आहे. यंदा लीगच्या प्रत्येक सामन्यात सरासरी 17 सिक्स मारले जात आहेत. तर 2009 मध्ये त्यांची संख्या फक्त 8 होती. गेल्या 16 हंगामात या लीगमध्ये बरेच बदल झाले आहेत. या लीगमुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत आहेत. अवघ्या 20 लाख रुपयांना विकले गेलेले मयंक यादव, शशांक सिंग, नितीश कुमार रेड्डी, आशुतोष शर्मा यांसारखे खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. नवे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळेच देशात निवडणुकीच्या काळातही प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आयपीएल सुरु होण्याआधी जिंकली होती ट्रॉफी

भारताने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता, परंतु त्यानंतर 2014 मध्ये फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आणि 2016 आणि 2022 मध्ये दोनदा उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, आयपीएलमध्ये भारतीय संघाला टी२० वर्लडप जिंकता येत नाहीये का.

भारताने आतापर्यंत तीन वेळा आयसीसी विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. 1983 एकदिवसीय, 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. भारताच्या या विश्वचषक विजेत्या संघांमध्ये एक गोष्ट साम्य होती, या संघांमध्ये असे अनेक खेळाडू होते जे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये चांगले होते. पण अलिकडच्या वर्षांत भारताला टी-२० क्रिकेटमध्ये अशा खेळाडूंची उणीव भासत आहे. हार्दिक पंड्या याला नक्कीच अपवाद आहे.

काय आहे भारतीय संघाची कमजोरी

टीम इंडियाची आणखी एक कमजोरी म्हणजे दबावाखाली खेळाडू नर्व्हस होतात. २०२१ मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धही असेच घडले होते. २०२२ च्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही पांड्या वगळता आघाडीचे सहा फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.

याउलट ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या मॅथ्यू वेडने 2021 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची बाजुच फिरवली. बलाढ्य संघ फलंदाजी आणि गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात. पण बहुतेक भारतीय गोलंदाजांना फलंदाजीही करता येत नाही. जर आपण याची इंग्लंडशी तुलना केली, तर 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आदिल रशीदच्या नावावर 10 प्रथम श्रेणी शतके आहेत. यावरुन त्यांचा स्तर पाहिला जाऊ शकतो.

पुढील महिन्यात संघाची घोषणा

पुढील महिन्यात विश्वचषक संघाची घोषणा होणार आहे. निवडकर्त्यांनी त्यांच्या निर्णयात धाडसीपणा दाखवायला हवा. जे खेळाडू सतत हरत राहतात त्यांना बाहेर काढले पाहिजे. टीम इंडियाला अशा क्रिकेटर्सची गरज आहे ज्यांनी संघाला स्वत:च्या आधी स्थान दिले.

भारतालाही फॉर्मात असलेल्या आणि दबावात चांगली कामगिरी करू शकतील अशा खेळाडूंची गरज आहे. या आयपीएलमध्ये ऋषभ पंतची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मयंक यादवही आपले कौशल्य दाखवत आहे. दुखापत ही त्याच्यासाठी एक समस्या असली तरी, तरीही त्यांना संधी मिळू शकतात.