चेन्नई : प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं चेपॉक स्टेडियम, पिवळी जर्सी परिधान करुन CSK चे पोस्टर्स हातात घेऊन बसलेले हजारो फॅन्स, माहीचं संपूर्ण टीमसोबत ग्राऊंडला फेरी मारणं, माहीचं रॅकेट हातात घेऊन प्रेक्षक स्टँडमध्ये टेनिस बॉल मारुन आभार मानणं, संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा गजर, हा सर्व घटनाक्रम काय इशारा करतोय? धोनीची आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईमध्ये शेवटची मॅच होती का? काल रात्री कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मॅचनंतर भव्य नजारा पहायला मिळाला. 16 व्या सीजनमध्ये आपल्या घरात चेन्नई सुपर किंग्सचा हा शेवटचा सामना होता.
फॅन्स, प्लेयर्सच नाही, तर 14 मे च्या रात्री संपूर्ण चेन्नई भावूक झाली होती. धोनीने मैदानावर उपस्थित पोलिसांचे सुद्धा आभार मानले. त्याची गुडघे दुखापतीची जुनी समस्या पुन्हा दिसत होती. नी-कॅप घालून तो संपूर्ण मैदानाला फेरी मारत होता.
थालाने त्याला सुद्धा निराश केलं नाही
या दरम्यान महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टावर धोनीची ऑटोग्राफ घेतली. प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला केकेआरचा रिंकू सिंह सुद्धा ऑटोग्राफ घेण्यासाठी धोनीकडे आला. थालाने त्याला सुद्धा निराश केलं नाही. आता या सगळ्यामध्ये एकच प्रश्न आहे, धोनी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना दिसेल का?
???????! ?
A special lap of honour filled with memorable moments ft. @msdhoni & Co. and the ever-so-energetic Chepauk crowd ?#TATAIPL | #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/yHntEpuHNg
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
अजून दोन संधी आहेत
चेन्नईमध्ये आता फक्त दोन सामने होणार आहेत. क्वालिफायर-1 आणि 24 मे रोजी एलिमिनेटर चेपॉकवरच होणार आहे. चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये दाखल झाली, तर माहीचे फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतात. धोनीचा हा शेवटचा सीजन असल्याची सुद्धा सर्वत्र चर्चा आहे. धोनील ज्यावेळी या बद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा तो हजरजबाबीपणाने उत्तर देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो.
साखळी गटात चेन्नईचा शेवटचा सामना कधी?
चेन्नई सुपरकिंग्सची टीम 13 सामन्यात 15 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेची पुढची मॅच 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अरुण जेटली स्टेडियमध्ये होणार आहे. सीएसकेची ही शेवटची लीग मॅच आहे.