Hardik Panday : ‘या’ टॅलेंटेड प्लेयरच करियर आता फक्त हार्दिक पांड्याच वाचवू शकतो, एकवेळ BCCI चा सल्ला धुडकावलेला

| Updated on: Jul 08, 2024 | 11:20 AM

Hardik Panday : टीम इंडियात काही स्थानांसाठी स्पर्धा आहे. आता हा प्लेयर देशातंर्गत क्रिकेटमध्ये खेळायला तयार आहे. त्याच करियर वाचवण आता फक्त हार्दिक पांड्याच्या हातात आहे. काही महिन्यांपूर्वी या प्लेयरला रणजी, अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Hardik Panday : या टॅलेंटेड प्लेयरच करियर आता फक्त हार्दिक पांड्याच वाचवू शकतो, एकवेळ BCCI चा सल्ला धुडकावलेला
hardik pandya team india
Follow us on

टीम इंडियातून बाहरे गेलेल्या एका प्लेयरला पुन्हा टीममध्ये कमबॅक करायच आहे. पण आता हे सोप राहिलेलं नाही. T20 वर्ल्ड कप विजयानंतर समीकरणं बदलली आहेत. टीम इंडियात काही स्थानांसाठी स्पर्धा आहे. आता हा प्लेयर देशातंर्गत क्रिकेटमध्ये खेळायला तयार आहे. राज्याच्या टीमकडून खेळून राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचा त्याचा मानस आहे. काही महिन्यांपूर्वी या प्लेयरला रणजी, अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्याने तो ऐकला नाही. हा प्लेयर आहे ईशान किशन, ज्याच्यावर बेशिस्तीचे आरोप झाले. आता इशान किशनच करियर वाचवण फक्त हार्दिक पांड्याच्या हातात आहे.

टीम इंडियामध्ये इशान किशनच करियर वनडे वर्ल्ड कप 2023 पर्यंत शानदारपणे सुरु होतं. तो संघामध्ये होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंबंधी घेतलेल्या एका निर्णयावरुन सगळ बदललं. टीम इंडियामध्ये स्थान सोडाच BCCI ने त्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसाठी सुद्धा विचार केला नाही. T20 वर्ल्ड कप टीम तसच झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याच सिलेक्शन झालं नाही. लवकरच टीम इंडियाकडून त्याने शेवटचा सामना खेळला, त्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

त्याने बीसीसीआयच ऐकलं नाही

मानसिक थकव्याच कारण देऊन त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. BCCI च ऐकलं असतं तर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाच्या बळावर त्याने टीम इंडियात कमबॅक केलं असतं. त्याने बीसीसीआयच ऐकलं नाही. आता तो देशांतर्गत क्रिकेट खेळायला तयार आहे.

टीममध्ये कोणासोबत स्पर्धा?

फक्त देशांतर्गत क्रिकेट खेळून इशान किशन टीम इंडियात पुनरागमन करु शकतो का? कारण प्रश्न फक्त परफॉर्म करण्याचा नाहीय, तर त्याची स्पर्धा आता टीममध्ये आधीपासूनच असलेल्या खेळाडूंसोबत आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतर इशान किशला विकेटकीपर म्हणून टीममध्ये स्थान मिळणं कठीण दिसतय. अन्य विकेटकीपरचा विचार केल्यास संजू सॅमसन आणि ध्रुव जुरैलकडून स्पर्धा आहे. यशस्वी जैस्वाल आता प्रत्येक टूरमध्ये टीम सोबत असतो. अभिषेक शर्माकडून कडवी टक्कर मिळेल.

हार्दिक पांड्या कसं वाचवू शकतो करियर?

इशान किशन स्वबळावर टीम इंडियात पुनरागमन करेल का? हे सांगणं कठीण आहे. हार्दिक पांड्याच त्याच करियर वाचवू शकतो असं बोलल जातय. हार्दिक पांड्या इशान किशनच करियर कसं वाचवू शकतो? हा तुमचा प्रश्न आहे. त्याच उत्तर दोन खेळाडूंमधील बॉन्डिंग. दोघांमध्ये मैत्रीच घट्ट नातं आहे. इशान किशन हार्दिक पांड्याचा निकटवर्तीय मानला जातो. अनेकदा इशान हार्दिक सोबत प्रॅक्टिस करताना दिसतो.


पण, आधी सिद्ध करावं लागेल

इशान-हार्दिकमध्ये चांगली बॉन्डिंग आहेच. पण रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या T20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन आहे. अशावेळी इशानला मैत्रीचा लाभ मिळू शकतो. कमीतकमी T20 टीममध्ये स्थान मिळेल. त्यासाठी इशानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध कराव लागेल.