Ishan Kishan Girlfriend: इशान किशनच्या दुहेरी शतकावर गर्लफ्रेंडची अशी प्रतिक्रिया

| Updated on: Dec 10, 2022 | 6:25 PM

इशान किशन याने दुहेरी शतक ठोकलं आहे. यावर त्याची गर्लफ्रेंडन अदिती हिने इन्स्टाग्राम स्टेटसवर त्याचा फोटो शेअर केला आहे.

Ishan Kishan Girlfriend: इशान किशनच्या दुहेरी शतकावर गर्लफ्रेंडची अशी प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर सध्या इशान किसनची (Ishan Kishan) चर्चा आहे. कारण त्याने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात दुहेरी शतक ठोकलं आहे. इशान किशन हा आयपीएलमधला लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी इशान किशनला संघात संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं आणि सर्वात जलद दुहेरी शतक (Ishan Kishan double century) झळकावलं.

इशान किशनने दुहेरी शतक ठोकल्यानंतर त्याच्याबाबत आता सोशल मीडियावर सर्च केले जात आहे. इशान किशनची गर्लफ्रेंड कोण याबाबत ही सर्च केले जात आहे. भारतीय क्रिकेटर इशान किशन हा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर चर्चेत आला होता. इशानचे नाव एका मुलीसोबत जोडले जात आहे. कोण आहे ती तरुणी?

अदिती हुंडिया (Aditi Hundia) असे त्या मुलीचे नाव असून ती इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. आदिती व्यवसायाने संगीत कलाकार आहे. अदिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि लोकांना तिचे फोटो खूप आवडतात.

कोण आहे अदिती हुंडिया

14 जानेवारी 1997 रोजी जयपूरमध्ये तिचा जन्म झाला होता. अदिती हुंडिया फॅशन जगतात खूप सक्रिय आहे. तिची ग्लॅमरस स्टाइल लोकांना खूप आवडते. अदितीने पोलंडमधील मिस सुपरनॅशनल स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

2019 मध्ये अदिती इशानच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली होती. या सामन्यातील इशानच्या कामगिरीवर ती चीअर करत होती. यानंतर तिचे नाव इशानशी जोडले गेले.

अदिती एक प्रोफेशनल मॉडेल आहे. पण ती संगीताशी संबंधित आहे. अदिती 2017 मिस इंडियाची फायनलीस्ट राहिली आहे.अदिती हुंडियाने तिच्या करिअरला नेहमीच मॉडेल म्हणून पाहिले आहे आणि तिने याची सुरुवात 2016 पासून केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशान किशन आणि आदिती हुंडिया एकमेकांना डेट करत आहेत.

दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला नाहीये. अदितीचे इन्स्टाग्रामवर अडीच लाख फॉलोअर्स आहेत तर ती फक्त 44 लोकांना फॉलो करते.

अदिती हुंडिया हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर इशांत किशनचे 2 फोटो शेअर केला आहे.