Ind vs BAN 3rd ODI: इशान किशनने तिसऱ्या वनडेमध्ये शानदार दुहेरी शतक ठोकलं आहे. या इनिंगमध्ये त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना धू-धू धूतला. त्याने फक्त 126 बॉलमध्ये 200रन ठोकले आहेत. ईशानने 85 चेंडूत आपलं शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. (Ishan Kishan slams Double Century aginst Bangladesh)
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना (ODI) चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियामध्ये आजच्या सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले होते. ईशान किशन (Ishan Kishan) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.पहिल्या दोन वनडे गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका आधीच गमावली आहे. टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना जिंकून क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल.
बांगलादेशला आतापर्यंत क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुल कर्णधार आहे. हा सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जात आहे.