इशान किशनला ऋषभ पंतची जागा हिसकवायची आहे? किशन म्हणाला…

| Updated on: Feb 22, 2022 | 4:53 PM

इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋषभ पंतचं (Rishabh Pant) करीयर एकत्र सुरु झालं. दोघे 2016 सालच्या अंडर-19 वर्ल्डकप संघात एकत्र होते. इशान किशन त्या टीमचा कॅप्टन होता. ऋषभ पंत त्या संघात सलामीवीर आणि मुख्य फलंदाज होता. इशानच्या आधी ऋषभला टीम इंडियात (Indian Cricket Team) स्थान मिळालं.

इशान किशनला ऋषभ पंतची जागा हिसकवायची आहे? किशन म्हणाला...
Ishan kishan - Rishabh Pant
Follow us on

मुंबई : इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋषभ पंतचं (Rishabh Pant) करीयर एकत्र सुरु झालं. दोघे 2016 सालच्या अंडर-19 वर्ल्डकप संघात एकत्र होते. इशान किशन त्या टीमचा कॅप्टन होता. ऋषभ पंत त्या संघात सलामीवीर आणि मुख्य फलंदाज होता. इशानच्या आधी ऋषभला टीम इंडियात (Indian Cricket Team) स्थान मिळालं. आता वनडे आणि टी-20 मध्ये हे दोन्ही खेळाडू भारतीय संघाचा भाग आहेत. वैशिष्ट्य म्हणजे पंत आणि किशन दोघेही विकेटकीपर फलंदाज आहेत. त्यामुळे एकअर्थाने दोघे परस्परांचे स्पर्धक आहेत. स्पर्धा असली, तरी ऋषभ माझा चांगला मित्र आहे. मला कधीही त्याची जागा घ्यायची नाही, असं इशानने सांगितलं.

“भारतासाठी मला विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळायचं आहे. सध्या ऋषभ संघात असून तो चांगला खेळतोय. ज्या काही संधी मिळतील, त्यात चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. स्पर्धा चांगली गोष्ट आहे” असं इशान किशन म्हणाला. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला ही मुलाखत दिली.

“आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. सोबत असताना आम्ही एकत्रच फिरतो. चित्रपट पाहतो. क्रिकेटबद्दलही आम्ही खूप बोलतो. त्याची जागा मला हवी, असा विचार कधीही माझ्या डोक्यात आला नाही. तो सुद्धा तसाच विचार करत असेल, हे मला माहितीय. क्रिकेट खेळताना आम्ही परस्परांबरोबर स्पर्धा करतोय असा विचारही करत नाही” अस इशानने सांगितलं. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत दोघे संघाचा भाग होते. यापूर्वी टी-20 वर्ल्डकपमध्येही दोघे एकत्र खेळले आहेत. पुढच्या काही मालिकांमध्ये दोघे एकत्र खेळताना दिसू शकतात.

किशन सध्या कट शॉटवर काम करतोय

इशान किशनने सांगितले की, “त्याला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. तो म्हणाला की, 16 व्या वर्षापासून मी प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. खेळायला सुरुवात केल्यापासून मी भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहात होतो. मधल्या षटकांमध्ये अधिकाधिक धावा जमवणे, स्ट्राईक रोटेट करणे आणि कोणतीही रिस्क न घेता धावा काढणे यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच मी माझ्या कट शॉटवरही काम करत आहे. मी पूर्वी चांगला कट शॉट खेळायचो, सध्या मी यासाठी रोहित शर्माची मदत घेत आहे.”

संबंधित बातम्या

IND vs SL:’जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’, साहाचा सौरव गांगुलीबद्दल धक्कादायक खुलासा

Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार

Wriddhiman Saha: ऋद्धीमान साहाच्या आरोपावर राहुल द्रविड यांनी सोडलं मौन, म्हणाले…