मुंबई : इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मोठी कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी इंग्लंडच्या आणखी एकाही खेळाडूला जमली नव्हती. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलास्टर कूकचा (Alaster Cook) रेकॉर्ड मोडित काढत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आता अँडरसन अव्वल स्थानी असेल. (James Anderson to play Most test mataches For England)
अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून सर्वाधिक म्हणजेच 162 सामने खेळले आहेत आणि आणखीही खेळतो आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अँडरसनने मैदानात पाऊल ठेवताच हे यश मिळवलं. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून दुसर्या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपूर्वी न्यूझीलंडचा इंग्लंडशी शेवटचा कसोटी सामना पार पडत आहे.
38 वर्षांच्या अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले 162 सामने पूर्ण केले. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळल्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा विक्रम त्याने मोडित काढला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. तो इंग्लंडकडून आतापर्यंत 147 कसोटी सामने खेळला आहे.
भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची महत्त्वाची भूमिका असणार आहे. इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्व अँडरसनच्या खांद्यावर असणार आहे. तसंच भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवण्याची जबाबदारी देखील अँडरसनच्या खांद्यावर असेल.
(James Anderson to play Most test mataches For England)
हे ही वाचा :
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?
WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता