नवी दिल्ली: इंग्लंडने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमध्ये ऑलराऊंडर्स किती महत्त्वाचे आहेत, ते पुन्हा एकदा दिसून आलं. भारताकडे हार्दिक पंड्याच्या रुपात असं कमालीच प्रदर्शन करणारा एक ऑलराऊंडर आहे. हार्दिक सोडल्यास, सध्या त्याच क्षमतेचा फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करणारा खेळाडू दिसत नाही. देशातंर्गत क्रिकेटमध्ये असा एक क्रिकेटपटू आहे. आकिब नबी असं या खेळाडूच नाव आहे. तो जम्मू-काश्मीरकडून क्रिकेट खेळतो.
मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता
नबीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तो भेदक गोलंदाजीच्या बळावर विकेट काढताना आणि बॅटिंग करताना मोठे फटके खेळताना दिसतोय. अकिब नबीकडे चेंडूला स्विंग करण्याची क्षमता आहे. लोअर ऑर्डरमध्ये डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे.
आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस पडणार?
आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी 10 फ्रेंचायजींनी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी प्रसिद्घ केलीय. आता डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक टीमला चांगल्या ऑलराऊंडर्सची गरज आहे. आकिब नबीचा आयपीएल लिलावात समावेश झाला, तर फ्रेंचायजीकडून त्याच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
उमरानची वेगळी ओळख
सध्या उमरान मलिक देशात जम्मू-काश्मीरच नाव उंचावतोय. मलिकने आपल्या वेगाने फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केलीय. आयपीएलमध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलं. त्याबळावर तो टीम इंडियामध्ये पोहोचला. भविष्यातीत स्टार म्हणून उमरानकडे पाहिलं जातय.