लंडन : स्वत: ला भारतीय क्रिकेट संघाचा चाहता म्हणवून घेणाऱ्या जार्वो 69 चे कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीत. भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो मैदानात दाखल झाला. दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने मैदानात प्रवेश केला. इंग्लंडच्या डावातील 34 व्या षटकात त्याने मैदानात प्रवेश केला. त्यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. ‘जार्वो 69’ यापूर्वी लॉर्ड्स आणि लीड्स येथे खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यातदेखील मैदानात उतरला होता. (Jarvo 69 comes back for third time during 4th Test, tried Bowling this time)
लीड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ‘जार्वो 69’ मैदानात दाखल झाला होता. पॅड, हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज घालून तो फलंदाजीला उतरला. रोहित शर्मा बाद होताच जार्वोने थेट खेळपट्टी गाठली. नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून मैदानाबाहेर काढले.
Finally Jarvo back into the attack ???#jarvo69 pic.twitter.com/tJeaS54A7a
— Subhash Godara???? (@Subhash92684430) September 3, 2021
टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विननेही ‘जार्वो 69’ च्या या विचित्र कृतीनंतर ट्विट केले होते. त्याने जार्वोला असे न करण्यास सांगितले होते. यापूर्वी लॉर्ड्स कसोटी सामन्यात ‘जार्वो 69’ भारतीय संघाची जर्सी परिधान करून मैदानात शिरला होता. त्यावेळी तो म्हणत होता की, मी टीम इंडियासाठी खेळतो. त्यानंतर जार्वोने ट्विटरवर आपली ओळख उघड केली.
लीड्सच्या हेंडिग्ले स्टेडियममध्ये घुसलेल्या जार्वो 69 ला शिक्षादेखील झाली आहे. ‘जार्वो 69’ ला सुरक्षा भंगासाठी दंड ठोठावण्यात आला आहे आणि हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने हा सुरक्षा भंग मानला आणि सांगितले की, त्या व्यक्तीला लीड्सच्या गॅलरीत प्रवेश दिला जाणार नाही.
#jarvo69 what’s going on @ECB_cricket pic.twitter.com/VNMxLQyQWR
— Navaneeth Shetty (@navatheen) September 3, 2021
इतर बातम्या
IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला ‘हा’ महत्वाचा सल्ला
PHOTO: मुंबईत तयार होत आहे धोनीचं नवं घर, समुद्राच्या शेजारी असणाऱ्या घराचे फोटो साक्षीने केले शेअर
(Jarvo 69 comes back for third time during 4th Test, tried Bowling this time)