मुंबई: दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरीज आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय. काल संध्याकाळी या बाबत माहिती समोर आली. टीम इंडियासाठी हा एक झटका आहे. जसप्रीत बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झालीय. त्यामुळे पुढचे 4 ते 6 महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार आहे.
जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसल्याची शुक्रवारी सकाळी बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली. बुमराह बद्दल ही बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर बॉबी देओल ट्रेंड होतोय.
ट्रेंड होण्यामागे कारण व्हिडिओ
बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर अचानक अभिनेता बॉबी देओलची का चर्चा सुरु झालीय? याच कारण आहे बॉबी देओलचा एक व्हिडिओ. सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका क्रिकेट मॅचमधील हा व्हिडिओ आहे.
या मॅचमध्ये बॉबी देओल गोलंदाजी करताना दिसतोय. या व्हिडिओत बॉबी देओल एका वेगळ्याच Action मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. फॅन्सनी या Action ची जसप्रीत बुमराहसोबत तुलना केलीय.
बॉबी देओलची Action बुमराहसारखी ?
सेलिब्रिटी लीगमधला बॉबी देओलचा हा व्हिडिओ आहे. तिथे तो काही सामने खेळला होता. बॉबी देओलची गोलंदाजाी Action चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. काहींनी त्याला थेट जसप्रीत बुमराहच म्हटलय. बुमराहच्या दुखापतीनंतर फॅन्स निराश आहेत. पण ते थोडी मजा-मस्ती सुद्धा करतायत. म्हणून मस्करीमध्ये ते बॉबी देओलची टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड करण्याचा सल्ला देतायत.
I know who can replace Bumrah pic.twitter.com/XielNA2v91
— Sudhanshu’ (@whoshud) September 29, 2022
बुमराहला पर्याय कोण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी दुसऱ्या गोलंदाजाची निवड झालीय. मोहम्मद सिराजची आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडियात निवड झालीय. तो बुमराहची जागा घेणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी बुमराहच्या जागी कोण? याची घोषणा अजूनही झालेलाी नाही. सध्यातरी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर या दोघांची नाव या शर्यतीत आघाडीवर आहेत. दोघांचाही स्टँडबाय म्हणून वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आलाय.