‘एका वर्षात तो संपून जाईल’, Shoaib Akhtar चं भारतीय क्रिकेटपटूबद्दलच ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

| Updated on: Sep 30, 2022 | 5:47 PM

Shoaib Akhtar चे ते वक्तव्य पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण काय?

एका वर्षात तो संपून जाईल, Shoaib Akhtar चं भारतीय क्रिकेटपटूबद्दलच  ते वक्तव्य पुन्हा चर्चेत
शोएब अख्तर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण त्यानंतरही तो स्वस्थ बसलेला नाही. सततच्या विधानांमुळे शोएब अख्तर नेहमीच चर्चेत असतो. खासकरुन टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंबद्दल तो विधान करत असतो. विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी शोएब सातत्याने त्याच्याबद्दल विधान करत होता. आता पुन्हा एकदा त्याचं जुन वक्तव्य चर्चेत आला.

अजून 4 ते 6 महिने लागतील

दुखापतीमुळे टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाहीय. जसप्रीत बुमराहला बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास होतोय. त्यामुळेच तो आगामी वर्ल्ड कपला मुकणार आहे. यातून बाहेर येण्यासाठी अजून 4 ते 6 महिने लागतील. तो पर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब रहाव लागणार आहे.

कायमस्वरुपी घातक ठरु शकते

बुमराहला दुखापत झाल्यानंतर शोएब अख्तरच जुनं वक्तव्य चर्चेत आलय. एकादा पाठिला झालेली दुखापत कायमस्वरुपी घातक ठरु शकते, असा कयास शोएबने लावला होता. दीर्घ क्रिकेट करीयरमध्ये शोएब अख्तरला अनेकदा दुखापत झाली होती. पेस बॉलरला किती सहज दुखापत होते आणि त्यातून बाहेर येणं किती कठीण असतं, हे त्याला चांगलं ठाऊक आहे.

तीन वर्षात तिसऱ्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत

बुमराहला तीन वर्षात तिसऱ्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाली आहे. सहाजिकच त्याचा प्रदर्शनावरही परिणाम झालाय. मागच्यावर्षी शोएबने बुमराहची दुखापत आणि फॉर्मबद्दल एका चॅनलवर चर्चा केली. त्यावेळी त्याने बुमराहचा फिटनेस आणि करीयरबद्दल काही वक्तव्य केली होती. तेच व्हिडिओ पुन्हा शेयर केले जात आहेत.

फ्रंटल आर्म एक्शनवाल्या बॉलरला जेव्हा दुखापत होते, तेव्हा….

“बुमराहची जी गोलंदाजी Action आहे, त्यामध्ये त्याला कायमस्वरुपी पाठिची दुखापत होऊ शकते. जसप्रीत बुमराहची बॉलिंग फ्रंटल Action वर अवलंबून आहे. अशी Action असणारे गोलंदाज पाठ आणि खांद्याने वेग आणतात. फ्रंटल आर्म एक्शनवाल्या बॉलरला जेव्हा दुखापत होते, तेव्हा त्याने कितीही प्रयत्न केले तरी पाठदुखी पाठलाग सोडत नाही” असं शोएबने म्हटलं होतं.

एका वर्षात संपून जाईल

“मी इयान बिशप, शेन बॉन्डची पाठदुखी पाहिली आहे. बुमराहला आता हा विचार करण्याची गरज आहे की, मी मॅच खेळलो आणि रिहॅबमध्ये गेलो. त्याला मॅनेज करावं लागेल. अन्यथा एक वर्षात संपून जाईल” असं शोएब अख्तर म्हणाला होता.