मुंबई: जसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाली आहे. दुखापतीमुळेच तो काल झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार जसप्रीत बुमराहला बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर झालं आहे. त्यासाठी सर्जरीची आवश्यकता नाही. पण ही दुखापत बरी व्हायला 4 ते 6 महिने लागतील. यापूर्वी सुद्धा त्याने अशा प्रकारच्या दुखापतीचा सामना केलाय.
बुमराहला पहिल्यांदा ही दुखापत कधी झालेली?
2019 मध्ये जसप्रीत बुमराहने पहिल्यांदा या दुखापतीचा सामना केला होता. आता टी 20 वर्ल्ड कपआधी या दुखापतीने टीम इंडियाला धक्का दिलाय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काल पहिला सामना झाला. त्याआधी प्रॅक्टिस सेशन दरम्यान बुमराहने पाठदुखीची तक्रार केली होती.
स्ट्रेस इंजरी काय आहे?
या स्ट्रेस फ्रॅक्चरने बुमराहसह अनेक गोलंदाजांना बराच काळ मैदानापासून लांब ठेवलय. हाडांमध्ये जिवंत टिश्यू असतात. त्यावर जास्त दबाव टाकला, तर नुकसान होतं. सुजण्याशी संबंधित सेल्सची वाढ होते. हाडांच्या सुजण्याला बोन स्ट्रेस इंजरी किंवा स्ट्रेस रिएक्शन म्हणतात.
फ्रॅक्चरमध्ये लक्ष देण्याची गरज
MRI मध्ये दुखापतीबद्दल समजतं. पण सुजण्याकडे दुर्लक्ष केलं, तर ती दुखापत फ्रॅक्चरमध्ये बदलते. वेगवान गोलंदाजांच्या पाठीच्या खालच्या भागात वर्टेब्रेमध्ये असा फ्रॅक्चर होतो.
बुमराहला 3 वेळा स्ट्रेस फ्रॅक्चर
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसऱ्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चर झालय. याआधी 2019 साली पहिल्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. बुमराहशिवाय हार्दिक पंड्याने सुद्धा या दुखापतीचा सामना केलाय.
हार्दिक पंड्याला अशी दुखापत कधी झालेली?
आशिया कप 2018 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यात हार्दिक पंड्याच्या कमरेला मार लागला होता. त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्याला या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला.