मुंबई: वर्ल्ड कपसाठी दोन दिवसांपूर्वी टीम जाहीर झाली. जसप्रीत बुमराहचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपसाठी फिट ठरला, हा टीम इंडियासाठी मोठा दिलासा आहे. पण अजूनही काही जणांच्या मनात त्याच्या फिटनेसबद्दल शंका आहे. इंग्लंडमधील टी 20 सीरीजच्यावेळी जसप्रीत बुमराहला पाठिची दुखापत झाली होती. त्याला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होता.
तो वेस्ट इंडिज आणि त्यानंतर आशिया कप स्पर्धेला मुकला. जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा जुना त्रास आहे. बंगळुरु एनसीएमध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीवर उपचार करण्यात आले. वर्ल्ड कपची टीम निवडण्यापूर्वी एनसीएमध्ये रितसर बुमराह आणि हर्षल पटेलची फिटनेस चाचणी घेण्यात आली.
टी 20 वर्ल्ड कप खेळण्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज खेळणार आहे. या दोन्ही सीरीजआधी जसप्रीत बुमराहने त्याचा NCA ट्रेनिंग कॅम्पमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओमध्ये फक्त एकटा बुमराह दिसतोय. टीम इंडियाचा दुसरा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सुद्धा त्याच्यासोबत NCA मध्ये होता. त्याला सुद्धा दुखापत झाली होती. ‘मेहनत करा, तुम्हाला हवं ते मिळेल’ असं कॅप्शन बुमहारने या व्हिडिओला दिलय.
या व्हिडिओमध्ये बुमराह व्हिडिओत वेट ट्रेनिंग आणि व्यायाम करताना दिसतो. बुमराहने गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. बुमराहच्या फिटनेसबद्दल मनात शंका असणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघावा. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे.
आशिया कपमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. याच एक कारण जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती हे सुद्धा आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियात नव्हता. भारताच्या पराभवाच ते सुद्धा एक कारण आहे. चेंडू स्विंग करण्याबरोबरत परफेक्ट यॉर्कर ही बुमराहच्या गोलंदाजीची खासियत आहे.