T20 WC: Jasprit Bumrah OUT, त्याची जागा कोण घेणार? ‘त्या’ दोघांपैकी एकाला मिळणार संधी

| Updated on: Sep 29, 2022 | 4:59 PM

T20 WC: BCCI समोर आता फक्त दोनच पर्याय. काय आहेत ते पर्याय?

T20 WC: Jasprit Bumrah OUT, त्याची जागा कोण घेणार? त्या दोघांपैकी  एकाला मिळणार संधी
jasprit-bumrah
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: T20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला आहे. त्याचवेळी टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप खेळणार नाहीय. पाठदुखीचा त्रास बळावल्याने तो वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेलाय. तो वर्ल्ड कपला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती ही टीम इंडियाला परवडवणारी नाही. कारण बुमराह गोलंदाजी करतो, त्यावेळी त्याची दिशा, टप्पा आणि यॉर्करला तोड नाहीय.

एकाला संधी मिळू शकते

आता जसप्रीत बुमराहच्या जागी टीम मॅनेजमेंटला नवीन पर्याय शोधावा लागणार आहे. सध्यातरी जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतील अशी दोन नाव आहेत. त्या दोघांचा वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये थेट समावेश करण्यात आला नव्हता. दोघांनाही स्टँडबायवर ठेवलं होतं. आता मात्र त्या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

त्याच्याकडे स्विंगची कला

मोहम्मद शमी आणि दीपक चाहर बुमराहची जागा घेऊ शकतील असे हे दोन खेळाडू आहेत. मोहम्मद शमीकडे जसप्रीत बुमराह इतकाच अनुभव आहे. दीपक चाहरकडे स्विंगची कला आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये चेंडू नवा असताना कशा विकेट काढायच्या? त्यात दीपक चाहर माहीर आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात हे दिसूनही आलं.

दिशा आणि टप्पा त्याचबरोबर यॉर्कर टाकण्याची क्षमता

बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने कुठल्या खेळाडूला दुखापत झाल्यास काय? हा विचार करुन मोहम्मद शमी आणि दीपक चाहरला स्टँडबायवर ठेवलं होतं. मोहम्मद शमीकडे सुद्धा नवा आणि जुना चेंडू हाताळण्याचा दीर्घ अनुभव आहे. योग्य दिशा आणि टप्पा त्याचबरोबर यॉर्कर टाकण्याचीही शमीची क्षमता आहे.

शमीचा आधीपासून का विचार केला नाही?

मोहम्मद शमी मागच्यावर्षीपासून टी 20 चे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. 2021 टी 20 वर्ल्ड कपमध्ये शमी आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता. शमीच्या वयाचा विचार करुन त्याचा टी 20 साठी विचार करायचा नाही, असं निवड समितीच धोरण होतं. पण आता पर्याय नाहीय.

निवड समिती कोणावर विश्वास दाखवणार?

मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. टीमला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाच योगदान दिलं होतं. आता निवड समिती कोणावर विश्वास दाखवते, ते लवकरच स्पष्ट होईल.