मुंबई: टोक्यो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग (Diamond League) मध्ये नवीन नॅशनल रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. स्टॉकहोम येथे ही डायमंड लीग स्पर्धा सुरु आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.94 मीटर अंतरावर भाला फेकून (javelin throw) आपलाच नॅशनल रेकॉर्ड मोडला. याआधी 14 जूनला टर्की मधील पावो नुरमी स्पर्धेत नीरजने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकून नॅशनल रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. काल नीरजने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. पावो नुरमी स्पर्धेत नीरजने रौप्य पदक विजेती कामगिरी केली होती. कुओर्तान स्पर्धेत 86.60 मीटरसह त्याने अव्वल स्थान मिळवलं होतं. डायमंड लीग स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात नॅशनल रेकॉर्ड बनवला. पण भाला फेकीचा दुसरा थ्रो फक्त 84.37 मीटर पर्यंत गेला. तिसऱ्या प्रयत्नात नीरजने सुधारणा केली व 87.45 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली.
चौथ्या प्रयत्नात नीरजने 86.77 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. शेवटचा थ्रो त्याने 86.84 मीटर अंतरावर फेकला. वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सने 90.31 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करुन स्पर्धेत एक नवीन रेकॉर्ड बनवला.
“I thought I could throw 90m today, but slow improvement is good!”@neeraj_chopra1 was happy with his Indian record at #StockholmDL
?? #DiamondLeague pic.twitter.com/O3jJgmCJ2n
— Wanda Diamond League (@Diamond_League) June 30, 2022
यावर्षी चार डायमंड लीग खेळल्या जाणार आहेत. पहिली लीग कतार दोहा येथे झाली. फिट नसल्यामुळे नीरज त्या लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. पुढची डायमंड लीग 10 ऑगस्टला मोनाको आणि वर्षातील अखेरची डायमंड लीग 26 ऑगस्टला लुसेन येथे होणार आहे. त्यानंतर 8 सप्टेंबरला ज्यूरिख येथे डायमंड लीगची फायनल खेळली जाईल.
डायमंड लीग मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पदकं दिली जात नाहीत. स्पॉट्स पोजिशनच्या हिशोबाने त्यांना गुण दिले जातात. पहिल्या स्थानावर राहणाऱ्या खेळाडूला 8 गुण, दुसऱ्या स्थानावरील खेळाडूला 7 गुण. सर्व लीग झाल्यानंतर पॉइंट्सच्या हिशोबाने टॉप 4 मधील खेळाडू फायनल खेळतात. पहिल्या लीग मध्ये सहभागी न झाल्यामुळे नीरज चोप्रा सध्या चौथ्या स्थानावर आहे.