Marathi News Sports Cricket news Jayant yadav to stay back for the odi series against south africa after washington sundar covid 19 positive
IND VS SA: वॉशिंग्टन सुंदरला कोरोना झाल्यामुळे ‘या’ खेळाडूचं फळफळलं नशीब, वनडेत मिळू शकते संधी
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया तीन वनडे सामन्यांचीही मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेआधी भारताला एक धक्का बसला आहे.
तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर
Follow us on
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया तीन वनडे सामन्यांचीही मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेआधी भारताला एक धक्का बसला आहे. भारतीय टीमचा ऑफ स्पिनर आणि अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे.
वॉशिंग्टन सुंदर कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही. सुंदरच्या जागी टीम इंडियाने जयंत यादवला दक्षिण आफ्रिकेतच थांबण्यास सांगितले आहे.
जयंत यादव भारतीय कसोटी संघाचा भाग आहे आणि आता तो वनडे संघासोबतही असणार आहे. जयंत यादवने 2016 मध्ये एकमेव वनडे सामना खेळला होता. त्यानंतर संघातून त्याला वगळण्यात आलं. कदाचित यावेळी त्याला वनडेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
वॉशिंग्टन सुंदर मार्च 2021 पासून संघाबाहेर आहे. त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने विजय हजारेमधून मैदानावर पुनरागमन केले होते. सिलेक्शन कमिटीने वनडे मालिकेसाठी सुंदरची निवड केली. पण कोविडमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरीज 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
असा आहे वनडे संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, आर अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा और मोहम्मद सिराज.