PAK vs ENG 1st Test: Joe Root ने अचानक मैदानात केली वेगळी गोष्ट, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

| Updated on: Dec 04, 2022 | 4:07 PM

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान-इंग्लंड कसोटी सामना सुरु असताना ज्यो रुटने असं काय केलं?

PAK vs ENG 1st Test: Joe Root ने अचानक मैदानात केली वेगळी गोष्ट, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
pak vs eng 1st test joe root
Image Credit source: Twitter
Follow us on

रावळपिंडी: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. या टेस्टसाठी बनवण्यात आलेल्या पीचवरुन वाद सुरु आहे. कारण पाटा विकेट असल्याने या पीचवर धावांचा पाऊस पडतोय. आधी इंग्लंड त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा या विकेटवर चांगली बॅटिंग केली. इंग्लंडच्या ज्यो रुटची आजच्या पिढीच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते.

पारंपारिक शॉट्स मारण्यावर विश्वास

इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ज्यो रुट धावा बनवण्यासाठी पारंपारिक शॉट्स मारण्याला प्राधान्य देतो. रुटने आता काही नवीन गोष्टी सुरु केल्या आहेत. बॉलरला विचलित करण्यासाठी त्याने आता स्कूप शॉटचा आपल्या ताफ्यात समावेश केलाय.

रुटने अशी एक गोष्ट केली, की….

इंग्लंडची टीम सध्या ‘बाझबॉल’ प्रकारच क्रिकेट खेळत आहे. यामध्ये आक्रमक पद्धतीने इंग्लंडची टीम क्रिकेट खेळत आहे. अनेक नवीन कल्पक पद्धतीचे फटके खेळले जात आहेत. ज्यो रुटने आता आपली ग्रीप आणि स्टान्समध्ये बदल केलाय. क्रिकेट चाहत्यांसाठी हे नवीन आहे. रावळपिंडी येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ज्यो रुटने अशी एक गोष्ट केली, की ज्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.

रुटने काय केलं?

अर्धशतक झळकावल्यानंतर ज्यो रुटने लेफ्टी फलंदाजी सुरु केली. मूळात ज्यो रुट एक रायटी बॅट्समन आहे. पाकिस्तानचा झाहीद महमूद राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. त्यावेळी रुटने लेफ्टी बॅटिंग सुरु केली. लेफ्टी खेळतानाही ज्यो रुट सहजनेते बॅटिंग करत होता.


पाकिस्तानला विजयासाठी दिलं लक्ष्य

या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 657 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानची टीम 579 धावांवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 7 बाद 264 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानला विजयसाठी 342 धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये झॅक क्रॉलीने 50, ज्यो रुटने 73 आणि हॅरी ब्रुकने 87 धावा केल्या.