मुंबई: वनडे आणि टी 20 च्या स्पर्धेत कसोटी क्रिकेटचं (Test Cricket) महत्त्व आजही टिकून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांची क्षमता तपासली जाते. फलंदाजांमध्ये किती संयम आहे? तो किती वेळ खेळपट्टीवर उभा राहू शकतो? हे कसोटी क्रिकेटमधूनच समजत. त्याचवेळी गोलंदाजांना सुद्धा दीर्घ स्पेल टाकावे लागतात. 10 किंवा 4 षटक गोलंदाजी करुन भागत नाही. दिवसाला 20 किंवा त्यापेक्षा जास्त ओव्हर्स गोलंदाजी करावी लागते. गोलंदाजाच्या क्षमतेची, फिटनेसची (Fitness) ही एक प्रकारची परीक्षाच असते. त्यामुळे कसोटी क्रिकेटला आजही मानाच स्थान आहे. बदलत्या काळानुसार आता कसोटी क्रिकेटही बदलतय. कसोटी मध्येही आता वेगवान खेळ पहायला मिळतोय. काही वेळा टेस्ट मध्ये वनडे आणि टी 20 (T20) शॉट्स पहायला मिळतात. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात हे पहायला मिळालं.
इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रुटने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात हा फटका खेळला. जो बिलकुल पारंपारिक क्रिकेटला धरुन नाहीय. कसोटी मध्ये हा शॉट फारच कमी पहायला मिळतो. खासकरुन ज्यो रुट सारख्या फलंदाजाच्या बॅट मधून हा शॉट पहायला मिळणं, ही एक वेगळी गोष्ट आहे. कारण तो कसोटी क्रिकेटला जास्त प्राधान्य देतो.
ज्यो रुटने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कूपचा फटका खेळला. जो थेट प्रेक्षक स्टँडमध्ये म्हणजे सिक्स होता. सामना पहायला मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक ज्यो रुट सारख्या फलंदाजाचा हा शॉट पाहून आश्चर्यचकीत झाले. नील वॅगनर सुद्धा पाहत राहिला.
Joe Root. You are ridiculous.
Scorecard/clips: https://t.co/AIVHwaRwQv
??????? #ENGvNZ ?? pic.twitter.com/0YIhsZ5T04
— England Cricket (@englandcricket) June 26, 2022
इंग्लंड क्रिकेटने ज्यो रुटच्य़ा या सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तो वेगाने व्हायरल होतोय. क्रिकेट चाहत्यांनी ज्यो रुटच्या या सिक्सचा कौतुक करताना हा कोच ब्रँडन मॅक्कुलम यांचा इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. ब्रँडन मॅक्कुलम सुद्धा आपल्या जमान्यात अशाच पद्धतीची धमाकेदार बॅटिंग करायचे. मॅक्कुलम इंग्लंडचे कोच असून संघाच्या विचारसरणीमध्ये बदल दिसतोय.