IPL 2022 आधी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक चांगली बातमी आहे. नक्कीच या संघाचे चाहते खूश होतील. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) सराव सुरु केला आहे. आपली गोलंदाजी अधिक धारदार करण्यावर जोफ्राने काम सुरु केलय. नेट्समध्ये तो मेहनत घेतोय. यामुळे आयपीएल 2022 मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची शक्यता वाढलीय. जोफ्रा आर्चरला मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आठ कोटी रुपये बोली लावून विकत घेतलं होतं. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो बरेच महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. इंग्लंडच्या सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातही तो संघाचा भाग नाहीय. दुखापतग्रस्त असल्यामुळे जोफ्रा आर्चर यंदाचा सीजन खेळणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.
भविष्याची तजतवीज म्हणून मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतलं. पण आता जोफ्राचा सराव करतानाचा व्हिडिओ आल्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो.
मुंबई इंडियन्सने आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आर्चरला आठ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं, त्यावेळी प्रत्येकाने हाच प्रश्न उपस्थित केला होता. तो खेळणार का? अजूनही या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट नाहीय. पण समोर आलेल्या व्हिडिओवरुन आता अंदाज वर्तवला जातोय.
जोफ्रानेच शेयर केला VIDEO
जोफ्रा आर्चर गोलंदाजीचा सराव करतानाचा हा व्हिडिओ आहे. जो त्याने स्वत: शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रा मनापासून तयारी करताना दिसतोय. आता तो दुखापतीमधून सावरलाय हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.
नेट्समध्ये जोफ्राचं कमबॅक
नेटसमध्ये सराव करुन जोफ्रा आर्चरने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. तो आयपीएल 2021 मध्ये खेळणार की, नाही हा हॉट टॉपिक आहे. जोफ्रा आर्चरचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सनेही शेयर केला आहेत. ज्यात तो फलंदाजी करताना दिसतोय. आयपीएल 2022 स्पर्धेला 26 मार्चला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. 15 व्या सीजनचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल.