मुंबई: दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेने दारुण पराभव केला. 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लिश संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली. इंग्लंडचा संघ 20 षटकही खेळू शकला नाही. एकापेक्षा एक सरस फलंदाजांनी भरलेला इंग्लिश संघ 149 रन्सवर ऑलआऊट झाला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोची पुन्हा एकदा चर्चा झाली. मागच्या सामन्यात 90 धावा फटकावणारा बेयरस्टो 30 धावा काढून आऊट झाला. त्याने आपल्या छोट्याशा इनिंग मध्ये एका चक्रावून टाकणारा फटका खेळला.
जॉनी बेयरस्टोने कागिसो रबाडाच्या यॉर्कर चेंडूवर ज्या पद्धतीचा चौकार मारला, ते पाहून प्रत्येकजण दंग झाला. बेयरस्टोचा फटका पाहून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटुंनी आपलं डोक पकडलं. सध्याचे क्रिकेटपटू यॉर्कर चेंडूवर चौकार मारतात. फलंदाज स्कूपचा फटका खेळून चेंडू सीमापार पोहोचवतात. बेयरस्टोचा फटकाच वेगळा होता.
That’s a 10 out of 10 @jbairstow21 ?? https://t.co/Z2gW4kHiAh
— Natalie Sciver (@natsciver) July 29, 2022
15 व्या ओव्हर मध्ये जॉनी बेयरस्टोने हा फटका खेळला. रबाडाने यॉर्कर टाकला. कुठल्याही गोलंदाजाच्या भात्यातील हे सर्वोत्तम शस्त्र आहे. पण बेयरस्टोने हा चेंडू सीमापार पाठवला. चेंडू बेयरस्टोच्या पायांच्या मध्ये होता. त्याने बॅट आत मध्ये घेऊन चेंडू सीमापार पोहोचवला. बेयरस्टोचा हा फटका पाहून विकेटकीपर डिकॉकने डोक्याला हात लावला. कागिसो रबाडाही दंग झाला. बेयरस्टोची विकेट रबाडानेच काढली. पहिला टी 20 सामना गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यासामन्यात पलटवार केला.