मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) 2022 साठी काल इंग्लंडने टीम जाहीर केली. संघाची घोषणा केल्यानंतर 6 तासांच्या आत टीमला एक मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Baistow) वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाहीय. इंग्लंडने (England) शुक्रवारी पाकिस्तान दौरा आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला. बेयरस्टो दोन्ही संघांमध्ये होता. दुखापतीमुळे जॉनी बेयरस्टो वर्ल्ड कपला मुकणार आहे. ECB ने संध्याकाळी उशिरा या दुखापतीबद्दल माहिती दिली. यामुळे इंग्लंडच्या अडचणी वाढल्या आहेत.
गोल्फ खेळताना बेयरस्टोला दुखापत झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. जॉनी बेयरस्टो इंग्लंड आणि यॉर्कशायर संघाकडून खेळतो. वर्ल्ड कप आणि उर्वरित सीजन मध्ये तो स्थानिक संघाकडून खेळू शकणार नाहीय. शुक्रवारी बेयरस्टो लीडस मध्ये गोल्फ खेळत होता. त्यावेळी पायाच्या खालच्या बाजूला त्याला दुखापत झाली. पुढच्या आठवड्यात तो एक्सपर्टला भेटणार आहे. त्यानंतर दुखापतीच स्वरुप स्पष्ट होईल.
You’ve inspired and entertained us so much this summer. And you will again ?
Speedy recovery, @JBairstow21 ❤️
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
इंग्लंडचा संघ पुढच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावर 7 टी 20 सामन्यांची मालिका आहे. बेयरस्टो आता यापैकी एकही सामना खेळू शकणार नाही. इंग्लंडने सध्या त्यांच्या वर्ल्ड कप संघात बेयरस्टोच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश केलेला नाही. पण तिसऱ्या कसोटीत बेयरस्टोच्या जागी कोण खेळणार? त्याची घोषणा केली आहे. नॉटिंघमशायरच्या बेन डकेटचा तिसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश केला आहे. पुढच्या गुरुवारपासून ओव्हल मध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होईल.