IND vs ENG: भारताविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीज आधी इंग्लंडने बदलला कॅप्टन

| Updated on: Jul 01, 2022 | 12:53 PM

IND vs ENG: भारताविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीज (T 20 Series) आधी इंग्लंडने आपल्या नव्या कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. ईऑन मॉर्गनने (Eoin Morgan) दोन दिवसापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली.

IND vs ENG: भारताविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीज आधी इंग्लंडने बदलला कॅप्टन
England Team
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: भारताविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीज (T 20 Series) आधी इंग्लंडने आपल्या नव्या कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. ईऑन मॉर्गनने (Eoin Morgan) दोन दिवसापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली, त्याआधीपासूनच इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कॅप्टनच्या शोधात होते. ईऑन मॉर्गनने जवळपास साडेसात वर्ष इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाच कर्णधारपद भूषवलं. या काळात जोस बटलर (Jos buttler) टीमचा उपकर्णधार होता. आता त्याची कर्णधारपदावर बढती झाली आहे. बटलरने याआधी नऊ वनडे आणि पाच टी 20 सामन्यात इंग्लंडच कर्णधारपद भूषवलं आहे. नेदरलँड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मॉर्गनच्या अनुपस्थितीत बटलरनेच संघाच कर्णधारपद भूषवलं होतं.

जोस बटलर सध्या तुफान फॉर्म मध्ये

जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. नेदरलँड विरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याची बॅट तळपली होती. त्याने यंदाच्या आय़पीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या कामगिरीच्या बळावरच राजस्थानच संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला. त्यांना फायनल जिंकता आली नाही. गुजरात टायटन्सने त्यांना नमवून यंदाच्या सीजनचं जेतेपद पटकावलं. नेदरलँड विरुद्धच्या सीरीजमध्ये पहिल्या वनडेत इंग्लंडने 498 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्या सामन्यात बटलरने 70 चेंडूत नाबाद 162 धावा फटकावल्या होत्या. तेव्हापासूनच बटलरला कॅप्टन बनवण्याच्या आणि कसोटीत ओपनिंगला उतरवण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कॅप्टन बनल्यावर बटलर काय म्हणाला?

जोस बटलरचा इंग्लंडच्या तीन क्रिकेटपटूंमध्ये समावेश होते. ज्यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकावलं आहे. इंग्लंडच्याच संघातील डेविड मलान आणि हेदर नाइट यांनी हा कारनामा केला आहे. इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर जोस बटलर म्हणाला की, “ईऑन मॉर्गनने मागची सात वर्ष शानदार नेतृत्व केलं, त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा एक संस्मरणीय काळ होता. तो एक प्रेरणादायक लीडर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणं एक शानदार अनुभव होता. मी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे”

बटलर किती वनडे आणि टी 20 सामने खेळलाय?

जोस बटलरने 2011 साली टी 20 मध्ये डेब्यु केला. 2012 मध्ये तो पहिला वनडे सामना खेळला. बटलर इंग्लंडसाठी आतापर्यंत 151 वनडे सामने खेळला आहे. त्याने 41.20 च्या सरासरीने 4120 धावा केल्या आहेत. त्याने 10 शतकं झळकावली आहेत. इंग्लंडसाठी तो 88 टी 20 सामने खेळलाय. 141.20 च्या स्ट्राइक रेटने त्याने 2140 धावा केल्या आहेत.