AUS vs ENG: याला म्हणतात टॅलेंट, Jos Buttler चा स्कूप शॉटवर SIX, पहा VIDEO

| Updated on: Oct 09, 2022 | 4:59 PM

AUS vs ENG: अशा शॉट मारण्यासाठी टेक्निक आणि गुणवत्ता अंगी असावी लागते. जोस बटलरने आज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्याच घरात धुतलं

AUS vs ENG: याला म्हणतात टॅलेंट, Jos Buttler चा स्कूप शॉटवर SIX, पहा VIDEO
jos buttler
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर (Jos Buttler) आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (ICC T20 World cup) आधी शानदार फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची त्यांच्याच घरात जोरदार धुलाई केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात (AUS vs ENG) पर्थवर टी 20 मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये जोस बटलरने जोरदार फटकेबाजी केली.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलच धुतलं

बटलरने या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने 32 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 68 धावा फटकावल्या. तो इनिंगची सुरुवात करण्यासाठी आला होता. 11 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आऊट झाला. बटलरने या मॅचमध्ये 212.50 च्या स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलच धुतलं. नाथन एलिसच्या चेंडूवर तो बाद झाला. मिड ऑफला केन रिचर्डसनने त्याची कॅच पकडली.

बटलरचा फटका पाहून सगळेच हैराण

बटलरने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. बटलरने दुखापतीनंतर या मॅचमध्ये पुनरागमन केलं. रिचर्डसनने पाचवी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बटलरने खेळलेला फटका पाहून सर्वचजण हैराण झाले. रिचर्डसनने ऑफ स्टम्पवर चेंडू टाकला होता. बटलरच्या छातीपर्यंत तो चेंडू आला. बटलरने या बॉलवर ऑफ स्टम्पच्या थोडं बाहेर येऊन स्कूप मारला. चेंडू फाइन लेगवरुन थेट प्रेक्षक स्टँडमध्ये गेला. या चेंडूवर त्याने सिक्स मारला.

रेकॉर्ड बनवला

बटलरने या मॅचमध्ये सलामीचा जोडीदार एलेक्स हेल्ससोबत मिळून शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावा जोडल्या. इंग्लंडला भक्कम सुरुवात करुन दिली. टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी ही दुसरी मोठी ओपनिग पार्टनरशिप आहे. याआधी एलेक्स हेल्स आणि मायकल लंबच्या जोडीने न्यूझीलंड विरुद्ध 2013 साली पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली होती.

तिसऱ्या नंबरवर हेल्स आणि क्रेग क्वीसविटरची भागीदारी आहे. त्यांनी 2011 साली 128 धावा केल्या होत्या. 2013 साली हेल्स आणि लंबच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 धावा केल्या होत्या.