दुबई : यंदाच्या टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं. न्यूझीलंडला आठ विकेट्सने नमवत ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी खिशात घातली. असे असले तरी ऑस्ट्रेलियाच्या एका चुकीची सगळीकडे चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जॉश हेजलवूडने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा झेल सोडला. याच एका चुकीमुळे नंतर केनने फक्त 48 चेंडूत तब्बल 85 धावा केल्या. केनच्या या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळाले होते. तर दुसरीकडे केनने 85 धावसंख्या करुन नवे रेकॉर्ड बनवले.
सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजी निवडली. फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी साधारण प्रदर्शन केले. मात्र एकट्या विल्यमसनने न्यूझीलंडचा संपूर्ण डाव सांभाळला. त्यांने 48 चेंडूत 85 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. केनच्या या खेळीमुळे न्यूझीलंडच्या संघाला 172 धावा काढता आल्या. याआधी 11 वे षटक सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेजलवुडने केनचा झेल सोडला. हा झेल जर यशस्वीरित्या पकडता आला असता तर केन एवढ्या साऱ्या धावा करुच शकला नसता.
या एका चुकीमुळे न्यूझीलंडच्या संघाला 172 धावांपर्यत मजल मारता आली. यामध्ये एकट्या केनच्या तब्बल 85 धावा आहेत. केनने आपल्या खेळात 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या या एका चुकीचा म्हणजेच केनचा झेल सोडलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
केनने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने तब्बल 85 धावा केल्या. टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या असून त्याने मार्लोन सॅम्युअल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सॅम्युअल्सने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 85 धावांची खेळी करून वेस्ट इंडिजला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, टी20 विश्वचषक 2021 ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. तसेच 173 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहजच पार केलं. यामध्ये यावेळी डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर सर्वाधिक धावा मिशेल मार्शने केल्या. त्याने 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
इतर बातम्या :
100 नक्षल्यांशी सामना, 26 जणांना कंठस्नान, गडचिरोलीच्या जंगलात नेमकं ऑपरेशन कसं राबवलं गेलं?