मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 16 सप्टेंबर रोजी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. कोहलीच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली होती. जगभरातून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले. आता भारताला पहिला वहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाशी चर्चा करत नाहीत, याबद्दलही खंत व्यक्त केली.
कपिल देव यांनी एबीपी न्यूज या वृत्तसंस्थेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी असा कधीच विचारही करु शकत नाही जसे आजकालचे क्रिकेटर्स वागतात. ते कोणताही मोठा निर्णय स्वत:च घेऊन मोकळे होतात. त्यांना संघ व्यवस्थापन, निवडकर्ते अशा कोणाशीच चर्चा करणं गरजेचं वाटत नाही, हे चूकीचं आहे. कोहलीने एका खराब दौऱ्यानंतर अशाप्रकारे निर्णय़ घेणं चूकीचं आहे. तो एक महान खेळाडू आहे.”
कोहलीने त्याच्या प्रतिक्रिये दरम्यान सांगितले होते की, त्याने हा निर्णय घेताना रवी शास्त्री, रोहित शर्मा, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी बातचित केली होती. यावर बोलताना कपिल देव म्हणाले,“जर विराटने खरच अशाप्रकारे बातचीत करुन निर्णय़ घेतला आहे. तर वेल डन विराट. त्याचा हा वैयक्तीक निर्णय असला तरी त्याने देशाची जी सेवा केली त्यासाठी त्याचं धन्यवाद आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.”
‘मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार.
वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसेच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देणं गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही फलंदाज म्हणून देत राहीन.
अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित शर्मा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन.
हे ही वाचा :
‘या’ युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, सुनील गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?
विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा
(Kapil dev says he was surprised about virat kohli decision to quit t-20 captaincy)