दुबई: आयपीएलची ओळख ही चुरशीचे आणि रोमहर्षक क्रिकेट सामने यासाठीच आहे. असाच एक सामना मंगळवारी (21 सप्टेंबर) पार पडला. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील सामन्यात राजस्थानने अवघ्या 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. त्यामुळे या धमाकेदार विजयानंतर सेलेब्रेशनही तसंच धमाकेदार करण्यात आलं. राजस्थानचे खेळाडू ड्रेसिंगरुमध्ये अतिशय आनंदी दिसून येत होते. यावेळी विजयाचा शिल्पकार कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) तर थेट शर्ट काढून डान्स केला. त्याला चेतन सकारियाने देखील साथ दिला.
दुबईच्या मैदानात राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात चमत्कार व्हावा तशी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावा रोखत कार्तिकने 2 विकेटही घेतले. यासोबतच राजस्थान संघाने विजय मिळवला. या विजयानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संघाचा प्रशिक्षक कुमार संगकाराने देखील सर्व खेळाडूंना काही मोलाचे शब्द सांगत त्याचा आत्मविश्वास आणखी वाढवला. या सर्वाचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
? Straight from a ????? dressing room. ?#HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/gNxggS8BA1
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 22, 2021
राजस्थानने सामन्यात प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर 186 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण सुरुवातीलाच सलामीवीर मयांक आणि राहुलने शतकी भागिदारी करत संघाला विजय अगदी सोपा केला. त्यानंतर पूरननेही देखील बऱ्यापैकी उर्वरीत जबाबदारी पार पाडली. पण अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी केवळ चार धावांची गरज असताना अक्षरश: चमत्कार घडला. गोलंदाजीला आलेला नवखा गोलंदाज कार्तिक त्यागीने संघाला चमत्कारीक असा विजय मिळवून दिला.
कार्तिकने पहिला चेंडू मार्करमला डॉट खेळवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मार्करमने एक धाव घेतली. आता विजयासाठी 3 धावा हव्या होत्या आणि समोर पूरन सारखा सेट फलंदाज होता. पण त्याच बोलवर त्यागीने पूरनला संजूच्या हाती झेलबाद करवलं आणि सामन्याला नवं वळण दिलं. त्यानंतर चौथा चेंडू दीपक हुडाला डॉट खेळवत पाचव्या चेंडूवर त्यालाही पूरनप्रमाणे बाद करवलं. ज्यानंतर अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना नवा आलेला फलंदाज फॅब अॅलनला डॉट बॉल टाकत त्यागीने राजस्थानला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा
IPL 2021: पंजाब किंग्सचा दीपक हुडा एका फोटोमुळे अडचणीत, BCCI करणार चौकशी, काय आहे ही पोस्ट?
इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी
(Kartik tyagi and rajsthan royals teammates celbrated with shirtless dance at dressing room after iconic win against punjab kings)