मुंबई: इंग्लंडने काल T20 सीरीजमध्ये पाकिस्तानला झटका दिला. पाकिस्तानला मायदेशात इंग्लंडकडून टी 20 सीरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सीरीजमधला शेवटचा 7 वा सामना झाला. इंग्लंडने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. तब्बल 67 धावांनी इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केलं.
राग स्पष्टपणे दिसून आला
प्रथम बॅटिंग करताना इंग्लंडने 20 ओव्हर्समध्ये 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या टीमने फक्त 142 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पण त्याचबरोबर खवळलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनी मैदानातच जोरदार घोषणाबाजी केली. एका पाकिस्तानी खेळाडूवर त्यांचा राग स्पष्टपणे दिसून आला.
त्याच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली
खुशदिल शाहने टी 20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली नाही. तो खूप धीम्यागतीने खेळला. त्यामुळे पाकिस्तानी चाहते नाराज झाले. तो बाद होताच मैदानातील प्रेक्षकांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. खुशदिल शाह आदिल रशीदच्या चेंडूवर बाद झाला.
प्रेक्षकांचा आरोप काय?
त्यावेळी प्रेक्षकांनी पर्ची-पर्ची अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. पर्ची या शब्दाचा अर्थ शिफारस असा होतो. म्हणजेच खुशदील शाहला शिफरसीमुळे पाकिस्तानी टीममध्ये स्थान मिळालय, असा प्रेक्षकांचा आरोप होता. अनेकदा इमाम उल हक या खेळाडू विरोधात सुद्धा अशी घोषणाबाजी झालीय.
मी तुम्हा सर्वांना अपली करतो की….
इमाम उल हकने खुशदिल शाह विरोधात झालेल्या घोषणाबाजीचा व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला. “मी सर्व फॅन्सना अपील करतो की, कुठल्याही खेळाडू विरोधात अशी घोषणाबाजी करु नका. अशामुळे खेळाडूच नुकसान होतं. खेळाडूला सपोर्ट द्या. आम्ही तुमच्यासाठी, पाकिस्तानसाठी खेळतो” असं इमाम उल हकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
I would like to request our fans to avoid such rants at any player as it can badly impact the player’s health and try to support them like you always do, regardless of the results. We play for YOU, we play for PAKISTAN ?? Stay blessed ✨
— Imam Ul Haq (@ImamUlHaq12) October 2, 2022
खुशदिल शाहवर फॅन्स नाराज?
खुशदिल शाहने इंग्लंड विरुद्धच्या या सीरीजमध्ये 4 डावात 21 च्या सरासरीने 63 धावा केल्या आहेत. 112.50 चा त्याचा स्ट्राइक रेट होता. खुशदिल आशिया कपमध्येही फ्लॉप ठरला होता. तरीही त्याचा टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आला. खुशदिलच्या कामगिरीवर काही माजी क्रिकेटपटुंनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. मात्र तरीही बाबर आजमने या खेळाडूला टीममध्ये स्थान दिलय.