मुंबई: वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डने IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे. IPL 2023 साठी खेळाडूंच्या रिटेंशनआधी ही बातमी आली आहे. कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आहे. त्याने आपल्या बळावर मुंबई इंडियन्सला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेत. मागच्या सीजनमध्येच पोलार्ड IPL मध्ये खेळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. आता निवृत्तीनंतर तो आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार नाहीय.
पोलार्डचा नवीन रोल कुठला?
पोलार्ड आयपीएलमध्ये मैदानात खेळताना दिसणार नाही. पण तो आयपीएलमध्येच असेल. कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये नव्या रोलमध्ये दिसणार आहे. IPL 2023 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच असणार आहे.
??ℍ? ???ℝ? ??? ??? ?? ??? ?#OneFamily #MumbaiIndians @KieronPollard55 pic.twitter.com/VPWTdWZEdH
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
मुंबईची बॅटिंग सुधारणार
IPL मधून कायरन पोलार्डने निवृत्ती घेतलीय. पण मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल. फ्रेंचायजीच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी पोलार्डवर असेल. पोलार्डकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. जगातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्याचा अनुभव पोलार्डकडे आहे. निश्चितच त्याचा अनुभव मुंबई इंडियन्सच्या युवा क्रिकेटपटूंच्या मदतीला येईल. कदाचित पुढच्यावर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलचा सहावा किताब जिंकेल.
?#OneFamily @KieronPollard55 pic.twitter.com/K5BVlTDeN0
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
मुंबई इंडियन्सकडून पोलार्ड कितीवर्ष खेळला?
मागची 13 वर्ष कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. एक दशकापासून पोलार्ड मुंबई इंडियन्स संघासोबत जोडलेला आहे. पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून 189 सामने खेळला. 171 इनिंगमध्ये त्याने 147.32 च्या स्ट्राइक रेटने 3412 धावा केल्या आहेत. पोलार्डच्या नावावर आयपीएलमध्ये 16 हाफ सेंच्युरी आहेत.
मुंबई इंडियन्सने किती कोटी मोजून रिटेन केलेलं?
आयपीएल 2022 मध्ये कायरन पोलार्ड विशेष चमक दाखवू शकला नव्हता. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर त्याने निराश केलं होतं. मुंबई इंडियन्सने 6 कोटी रुपये मोजून त्याला रिटेन केलं होतं. पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याच्या खेळण्याची शक्यता सुद्धा कमी होती. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्रेंचायजीने आपल्या ग्रेट प्लेयरला कोचिंगचा एक नवीन रोल दिलाय.