इंडियन प्रीमियर लीग 2024 आता अंतिम टप्प्याकडे आली आहे. आयपीएल सामन्यात एकामागे एक विक्रम होत आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा संघ दमदार कामगिरी करत आहेत. या संघाने 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये नंबर 1 टीम म्हणून केकेआर उतरणार आहे. केकेआरच्या या कामगिरीचे श्रेय गौतम गंभीर यांना दिले जात आहे. गौतम गंभीर यांनी मेंटर म्हणून आपली भूमिका चोख बजावली आहे. परंतु त्याचा चेहरा नेहमी गंभीर असतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत नाही. एका युवतीने मात्र गंभीरमध्ये बदल घडवून आणला आहे. त्या युवतीमुळे गौतम गंभीरच्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आले आहे.
कोलकाता नाइट राइडर्सचे मेंटर गौतम गंभीर यांनी सोशल मीडिया एका फॅनगर्लचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या फोटोत त्या युवतीचा फोटो असून तिने हातात बॅनर पकडले आहे. त्या युवतीने म्हटले आहे की, मी आपल्या क्रशला (आवडणाऱ्या मुलास) तोपर्यंत प्रपोज करणार नाही, जोपर्यंत गौतम गंभीर हासणार नाही. या मुलीची वेगळी मागणी पाहून गौतम गंभीर पिघळला आहे. गौतम गंभीरने आपल्या चेहऱ्यावर हास्य हसणारा फोटो शेअर केला आहे.
गंभीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यात सामन्यादरम्यान युवतीने एक बॅनर पकडले दिसत आहे. त्या बॅनरवरील वाक्य वाचू
आयपीएलमध्ये केकेआर दोन वेळा विजेता राहिला आहे. केकेआरच्या संघाकडे हास्य आणण्याची सध्या अनेक कारणे आहेत. आयपीएल २०२४ मध्ये केकेआरने केवळ प्लेऑफसाठी क्वालीफाई केला नाही तर अव्वल स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. केकेआरचे आतापर्यंत १३ सामन्यात १९ गुण झाले आहेत. यामुळे केकेआरला अंतिम सामन्यासाठी अनेक संधी मिळणार आहे.