मुंबई: आयपीएलमध्ये (IPL) कॅरेबियाई फलंदाजांचा जलवा पहायला मिळतो. लांबलचक षटकार मारण्याची त्यांची क्षमता अफलातून असते. आयपीएलला रोमांचक बनवण्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या पॉवर हीटिंग फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) आंद्र रसेलचे (Andre russell) नाव त्यात आघाडीवर आहे. एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता त्याच्या फलंदाजीत आहे. रसेल फक्त मॅचच्यावेळीच नाही, तर प्रॅक्टिसच्यावेळी सुद्धा तितकीच आक्रमक फलंदाजी करतो. रसेल केकेआर संघाचा महत्त्वाचा भाग आहे. केकेआरने यंदा चार खेळाडूंना रिटेन केलं. त्यात आंद्रे रसेलचा समावेश होतो. आंद्रे रसेल आतापर्यंत आठ सामने खेळला आहे. ज्यात त्याने 45.40 च्या सरासरीने 227 धावा केल्या आहेत. केकेआरचा संघ सध्या फुल फॉर्ममध्ये नाहीय. पण आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
मागच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रसेल मोक्याच्याक्षणी आऊट झाला. अन्यथा निकाल वेगळा दिसला असता. गुजरात टायटन्सकडून केकेआरचा 8 धावांनी पराभव झाला.
केकेआरचा संघ गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याआधी केकेआरचे खेळाडू जोरदार मेहतन घेत आहेत. हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर बनू शकतो. या सामन्यासाठी रसेल कसून सराव करतोय. सोशल मीडियावर आंद्र रसेलच्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यात त्याच्या जोरदार फटक्यामुळे एक खुर्ची मोडली.
व्हिडिओमध्ये रसेल नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसतो. त्याने एक जोरदार लांबलचक फटका लगावला. व्हिडिओमध्ये केकेआरचा एक खेळाडू खुर्ची पाहताना दिसतोय. या खुर्चीला एक मोठं छिद्र पडल्याच दिसतय. केकेआरच्या फॅन्सना हा व्हिडिओ आवडला. ते मोठ्या प्रमाणात लाइक करतायत.
मागच्या चार सामन्यात केकेआरचा पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर ते मार्गावरुन भरकटले. त्यांचे सहा सामने बाकी आहेत. त्यावर त्यांचा प्लेऑफचा प्रवेश ठरणार आहे. मागच्यावर्षी केकेआरची सुरुवात खूप खराब झाली. पण दुसऱ्यासत्रात त्यांनी शानदार पुनरागमन केलं. आधी प्लेऑफ नंतर फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता.