Rohit Sharma : KKR ने व्हिडिओ का डिलीट केला? म्हणून रोहित मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची चर्चा, VIDEO

| Updated on: May 11, 2024 | 9:34 AM

Rohit Sharma : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची टीम सोडणार आहे का? हा सध्या अंदाज आहे. पण प्रश्न यासाठी निर्माण होतोय, कारण समोर आलेलं व्हिडिओ फुटेज आणि फोटोंमधून तसे संकेत मिळतायत. व्हिडिओ आणि फोटोंमागच सत्य काय? या बद्दल पुढच्या सीजमध्ये ऑक्शनमध्येच समजेल.

Rohit Sharma : KKR ने व्हिडिओ का डिलीट केला? म्हणून रोहित मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची चर्चा, VIDEO
Rohit Sharma
Image Credit source: PTI
Follow us on

IPL 2024 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने खूप खराब प्रदर्शन केलं. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या या प्रदर्शनानंतर टीममधील अंतर्गत मतभेद, वाद समोर आले आहेत. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये जमत नसल्याच्या चर्चांवर आता हळूहळू शिक्कामोर्तब होऊ लागलय. पुढच्या सीजनमध्ये रोहित शर्मा कदाचित दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसू शकतो. त्याबद्दल चर्चांचा बाजार गरम आहे. पुढच्या सीजनमध्ये रोहितच्या जर्सीचा रंग बदलणार का? हा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अलीकडे झालेले बदल रोहित शर्माला पटलेले नाहीत. त्यामुळे तो नव्या टीमकडून खेळू शकतो असा अंदाज आहे. KKR ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओमुळे चर्चांचा बाजार गरम आहे. KKR ने नंतर तो व्हिडिओ डिलीट सुद्धा केला.

KKR फ्रेंचायजीने तो व्हिडिओ डिलीट करण्याआधी त्यात जी चर्चा झाली, ती समोर आली. KKR ने शेअर केलेला तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि KKR फ्रेंचायजीचे अभिषेक नायर होते. रोहित अभिषेक नायर यांच्याशी बोलताना दिसतोय. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडून केकेआरमध्ये जाऊ शकतो अशी शक्यता आहे.

रोहित शर्माने अभिषेक नायर यांना काय सांगितलं?

KKR ने रोहित शर्मा आणि अभिषेक नायरचा जो व्हिडिओ शेअर केला होता, तो नंतर डिलीट सुद्धा केला. त्या व्हिडिओमागे काय सत्य आहे? जाणून घेऊया. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर मैदानात बोलत असल्याच या व्हिडिओमध्ये दिसतय. यात रोहित शर्मा अभिषेक नायर यांना सांगत आहे की, ‘एक-एक गोष्ट बदलतेय….तो माझ्या वर आहे….ते माझं घर आहे. मी ते मंदिरासारख बनवलय’


मुंबईचा पुढचा सामना कोणाबरोबर?

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांची भेट तिथेच झाल्याची शक्यता आहे.

खरं काय हे कधी समजणार?

11 मे रोजी संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि केकेआरमध्ये मॅच होईल. त्याआधी या व्हिडिओमध्ये झालेल्या चर्चेचा अर्थ सध्याच्या परिस्थितीशी संबंधित दिसतोय. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची टीम सोडून पुढच्या सीजनमध्ये केकेआरकडून खेळू शकतो, असे संकेत यामधून मिळतायत. सध्या फक्त हा अंदाज आहे. IPL च्या पुढच्या सीजनसाठी ऑक्शन होईल, तेव्हाच सत्य काय ते समजेल.