IPL 2023 : आयपीएलमध्ये एक नवीन खेळाडू आलाय. तो पाकिस्तानातून बॅट घेऊन आलाय. IPL 2023 च मीटर ऑन आहे. 10 पेक्षा जास्त सामने झाले आहेत. आता या लीगमध्ये एका खेळाडूची एंट्री झालीय, तो किटबॅगमधून पाकिस्तानी बॅट घेऊन भारतात पोहोचलाय. KKR च्या टीममध्ये रिप्लेसमेंट जेसन रॉय आलाय. तो पाकिस्तानी बॅट घेऊन आयपीएलमध्ये धावा फटकावण्यासाठी सज्ज आहे.
IPL 2023 मध्ये KKR चा सामना आता गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. अहमदाबादमध्ये ही मॅच खेळली जाईल. जेसन रॉयला केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास त्याच्या पाकिस्तानी बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसेल.
कुठल्या कंपनीची बॅट आहे?
जेसन रॉय ज्या बॅटने खेळतो, ती बॅट पाकिस्तानी कंपनी CA स्पोर्ट्स बनवते. रॉय या कंपनीचा ब्रँड एंबेस्डर आहे. त्यामुळेच तो ही बॅट वापरतो. इंटरनॅशनल लीग असो किंवा T20 लीग जेसन प्रत्येक ठिकाणी CA ची स्टिकर असलेली बॅट घेऊन खेळतो.
बॅटची किंमत किती?
जेसन रॉयच्या बॅटच CA JR20 मॉडल आहे. त्याची किंमत 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. 39mm चा किनारा ही या बॅटची खासियत आहे. इंग्लिश विलोच्या या बॅटची बनावटच अशी आहे. या बॅटने खेळताना बाऊंड्री मारणं सोपं असतं. मैदानावर तुम्ही जेसन रॉयला आरामात सिक्स मारताना पाहता. त्यात त्याच्या बॅटचा सुद्धा रोल आहे,.
PSL मध्ये याच बॅटने शतक
जेसन रॉयने CA च्या या बॅटने पाकिस्तानातील देशांतर्गत T20 लीग PSL मध्ये वेगवान शतक ठोकलय. आता त्याची एंट्री IPL 2023 मध्ये झाली आहे. त्याला 2.8 कोटी रुपये मिळाले आहेत. तो स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सवर तो हल्लाबोल करु शकतो. IPL मध्ये त्याची बॅट जितकी गरजेल, तितका कोलकाता नाइट रायडर्सला फायदा होईल.