KKR vs CSK IPL 2023 : सध्या क्रिकेट विश्वात अजिंक्य रहाणेचीच चर्चा आहे. सर्वच जण एकच गोष्ट बोलतायत, अजिंक्य रहाणेने असं काय खाल्लय? ज्यामुळे तो इतकी तुफानी बॅटिंग करतोय. आयपीएलमध्ये रविवारी रात्री इडन गार्डन्सवर सीएसके आणि केकेआरमध्ये मॅच झाली. या सामन्यात अजिंक्यने आपल्या तुफानी बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने दे दणादण चौकार, षटकारांची बरसात केली. केकेआरच्या बॉलर्सचा त्याने चांगलाच समाचार घेतला.
29 चेंडूत अजिंक्य रहाणेने 71 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने सहा फोर आणि पाच सिक्स मारले. या इनिंगद्वारे अजिंक्य रहाणेने चेन्नई सुपर किंग्ससाठी वेगवान अर्धशतक झळकवताना एमएस धोनीला मागे टाकलं.
CSK कडून वेगवान अर्धशतक कोणी झळकवलय?
चेन्नईसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणाऱ्या खेळाडूंमध्ये सुरेश रैनाच नाव सर्वात वरती आहे. रैनाने वर्ष 2014 मध्ये मुंबईमध्ये पंजाब विरुद्ध फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावल होतं. आता रैनानंतर रहाणेने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकवलं. मोइन अलीसह रहाणे दुसऱ्या स्थानावर आहे. मोइन अलीने मागच्यावर्षी मुंबईत राजस्थान विरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
धोनीसोबत आणखी दोघे तिसऱ्या स्थानावर
चेन्नईच्या अन्य फलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास, एमएस धोनी तिसऱ्या नंबरवर आहे. वर्ष 2012 मध्ये बंगळुरुत मुंबई विरुद्ध त्याने 20 चेंडूत अर्धशतक झळकवल होतं. धोनीसोबत आणखी दोन फलंदाज आहेत, जे संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. यात एक अंबाती रायुडू आणि शिवम दुबे आहे. त्याने केकेआर विरुद्ध रविवारी धोनीची बरोबरी केली.
धोनीला रहाणेचा रेकॉर्ड मोडणं जमेल का?
शिवम दुबेने केकेआर विरुद्ध मोठे फटके खेळताना 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सच्या कुठल्याही फलंदाजाच संयुक्तरित्या हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे. अजिंक्य रहाणेची चर्चा असताना आता धोनीने आयपीएलमधून रिंटायरमेंटचे संकेत दिलेत. आय़पीएलमधून रिटायर होण्याआधी धोनीला रहाणेचा 19 चेंडूतील अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडणं जमले का? हा प्रश्न आहे.