KKR vs CSK 2023 : MS Dhoni च्या कॅप्टनशिपमध्ये वेगळेपण काय? स्वत: Ajinkya Rahane ने सांगितला अनुभव

| Updated on: Apr 24, 2023 | 11:44 AM

KKR vs CSK IPL 2023 : धोनीच्या नेतृत्वात खेळताना अजिंक्य रहाणेचा गेम इतका कसा बदलला?. धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये अशी काय जादू आहे? स्वत: रहाणेने या बद्दल सांगितलं.

KKR vs CSK 2023 : MS Dhoni च्या कॅप्टनशिपमध्ये वेगळेपण काय? स्वत: Ajinkya Rahane ने सांगितला अनुभव
IPL 2023 Dhoni-Rahane
Image Credit source: PTI/IPL
Follow us on

KKR vs CSK IPL 2023 : अजिंक्य रहाणे सध्या टॉप फॉर्ममध्ये आहे. भल्या भल्या दिग्गजांचे अंदाज त्याने चुकवलेत. अजिंक्य रहाणे टी 20 मध्ये इतका वेगवान खेळ दाखवेल, याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. पण अजिंक्य रहाणेने सर्वांचेच अंदाज चुकवलेत. अजिंक्यचा जणू स्वप्नवत खेळ सुरु आहे. पण अजिक्यच्या मते त्याचा सर्वोत्तम खेळ अजून बाकी आहे. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने काल कोलकाता नाइट रायडर्सवर मोठा विजय मिळवला. यामध्ये अजिंक्य रहाणेची 29 चेंडूतील 71 धावांची खेळी निर्णायक ठरली.

अजिंक्य रहाणेने आयपीएल 2023 च्या सीजनमधील काल दुसरं अर्धशतक झळकावलं. इडन गार्डन्सवरील अजिंक्यची KKR विरुद्धची ही खेळी खास आहे. कारण मागच्या सीजनमध्ये अजिंक्य केकेआरकडून खेळला होता. पण केकेआरने त्याला चालू सीजनसाठी रिटेन केलं नाही. सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीच्यावेळी अजिंक्य रहाणेने कॅप्टन एमएस धोनीचा खास उल्लेख केला.

अजिंक्य रहाणे काय म्हणाला?

“आतापर्यंत मी माझ्या सर्व इनिंग्सचा आनंद घेतलाय. माझा सर्वोत्तम खेळ अजून बाकी आहे, असं मला वाटतय. भारताकडून माही भाईच्या नेतृत्वाखाली मी बरीच वर्ष खेळलोय. आता सीएसकेमधून खेळताना धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये बरच शिकायला मिळतय” असं रहाणे म्हणाला.

सीएसकेच्या विजयात अजून कोणाच योगदान?

अजिंक्य रहाणेने काल केकेआर विरुद्धच्या सामन्यात तुफानी बॅटिंग केली. त्याने 29 चेंडूत 71 धावा फटकावल्या. सीएसकेकडून रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. डेवॉन कॉनवेने अर्धशतक झळकवून सीएसकेला जोरदार सुरुवात दिली. त्य़ानंतर ऑलराऊंडर शिवम दुबेने 50 धावांची खेळी केली. त्यामुळे धोनीच्या चेन्नईने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 235 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात केकेआरकडून जेसन रॉयने (61) आणि रिंकू सिंहने (53) धावा फटकावल्या. केकेआरने 8 बाद 186 धावा केल्या. त्यांनी 49 रन्सनी सामना गमावला.

विकेट कशी होती?

“मी माझ्या खेळाचा आनंद घेतोय. विकेट थोडी कठीण होती. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली होती. मला माझे शॉट्स खेळून लय कायम टिकवायची होती” असं अजिंक्य रहाणे म्हणाला. अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.