मुंबई: हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) डेब्यूमध्येच जबरदस्त प्रदर्शन करुन सर्वांना प्रभावित केलं आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात पैकी फक्त एकाच सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव झाला आहे. डेब्युमध्ये हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशिपची सर्वत्र चर्चा आहे. आज गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने एक असा निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. आयपीएलची (IPL) 26 मार्चला सुरुवात झाली. लवकरच या स्पर्धेला एक महिना पूर्ण होईल. हार्दिक पंड्याने आज एक वेगळा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारा हार्दिक पहिला कॅप्टन आहे. हार्दिकने आज टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2022 चा कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना झाला होता. त्या सामन्यात केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या डावात दवामुळे गोलंदाजी करणं मुश्किल असतं, म्हणून हा निर्णय घेतला, असं श्रेयस अय्यरने सांगितलं होत. प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचा केकेआरला फायदा झाला होता. त्यांनी सामना जिंकला होता. त्यानंतर प्रत्येक संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर सुरु झालेला हा ट्रेंड 22 एप्रिलपर्यंत कायम राहिला. म्हणजे कालच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापर्यंत हा ट्रेंड कायम होता. म्हणजे चार आठवडे आणि 34 सामने होईपर्यंत कुठल्याही कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला नाही. पण पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॅप्टनशिप करणाऱ्या हार्दिक पंड्याने हा ट्रेंड तोडला. शनिवारी म्हणजे आज 23 एप्रिलला डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Toss Update ?@gujarat_titans have won the toss and elect to bat first.
Follow the match ▶️ https://t.co/GO9KvGCXfW#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/ehxJfeLVgf
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मागचा सामना खेळला नव्हता. आज विजय शंकरच्या जागी तो संघात आला. गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल दुसऱ्याच षटकात अवघ्या सात रन्सवर आऊट झाला. कोलकाताने या सामन्यात तीन बदल केले आहेत. एरॉन फिंच, शेल्डन जॅक्सन आणि पॅट कमिन्स यांना बाहेर बसवलय. त्यांच्याजागी टिम साउदी, सॅम बिलिंग्स आणि रिंकू सिंहला संधी दिली आहे.