KKR vs GT IPL 2022: आनंद गगनात मावेना, नरेनच्या विकेटनंतर हार्दिकची बायको नताशाचा स्टेडियममध्येच भन्नाट Dance पहा VIDEO

| Updated on: Apr 23, 2022 | 9:24 PM

KKR vs GT IPL 2022: आज कोलकाता नाइटर रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सुनील नरेनचा विकेट गेल्यानंतर तिने प्रेक्षक गॅलरीत चक्क डान्स केला.

KKR vs GT IPL 2022: आनंद गगनात मावेना, नरेनच्या विकेटनंतर हार्दिकची बायको नताशाचा स्टेडियममध्येच भन्नाट Dance पहा VIDEO
Hardik pandya wife Natasha stankovic
Image Credit source: ipl/bcci
Follow us on

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये (KKR vs GT) सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये नताश स्टँकोविकने लक्ष वेधून घेतलं. गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी नताशा स्टँकोविक (Natasha stankovic) स्टेडियममध्ये उपस्थित असते. गुजरातच्या टीमला चिअर करताना त्यांचा उत्साह वाढवताना ती दिसते. नताश स्टँकोविक गुजरात टायटन्सची कॅप्टन हार्दिक पंड्याची (Hardik pandya) बायको आहे. यंदाच्या आयपीएल सीजनला सुरुवात झाल्यापासून नताशा चर्चेमध्ये आहे. स्टेडियममधील तिची उपस्थिती, तिच्या अदा नेहमीच चर्चेच्या विषय ठरतात. त्याशिवाय नताशाने हॉटेलच्या स्विमिंग पूलमधील तिचे काही फोटो, व्हिडिओ सुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिकच्या बरोबरीने नताशाचीही देखील तितकीच चर्चा आहे.

नताशाचा लक्षवेधी डान्स

आज कोलकाता नाइटर रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सुनील नरेनचा विकेट गेल्यानंतर तिने प्रेक्षक गॅलरीत चक्क डान्स केला. तिच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सुनील नरेनने पाच धावांवर फर्ग्युसनकडे झेल दिला. त्यानंतर नताशाला आपला आनंद आवरता आला नाही. तिने स्टेडियममध्ये बसल्याजागी डान्स सुरु केला. नताशाच्या स्टेडियममधील प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याचे बारीक लक्ष असतं. नताशा प्रत्येक अदा कॅमेऱ्यात कैद होतात. आजही तिने केलेला डान्स लक्षवेधी ठरला.

नताशाचा डान्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा

सीजनमधली तिसरी हाफसेंच्युरी

नताशाचा नवरा हार्दिक पंड्याही सध्या दमदार कामगिरी करतोय. त्याने आज 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. हार्दिकने या सीजनमधली तिसरी हाफसेंच्युरी झळकवली. हार्दिक प्रत्येक सामन्यात कॅप्टन इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. दुखापतीनंतर मैदानावर कमबॅक करणाऱ्या हार्दिकमध्ये एक वेगळा खेळाडू दिसतोय. तो संघासाठी जबाबदारी घेऊन खेळतोय.