मुंबई: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) सर्वांना प्रभावित केलं आहे. उमेशने आपल्या गोलंदाजीने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं आहे. कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणारा उमेश पावरप्लेमध्ये टीमला विकेट काढून देतोय. दुसऱ्याबाजूला या सीजनमध्ये अजून रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट तळपलेली नाही. रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु आहे. मुंबई अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आज मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा आणि केकेआरचा उमेश यादव आमने-सामने आले. त्यावेळी उमेश यादवने बाजी मारली. मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने उमेश यादवला सर्व सामने बेंचवर बसवून ठेवलं होतं. त्या अपमानाचा उमेश यादव जणू बदलाच घेतोय. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात दाखल झाल्यानंतर उमेश यादव आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे.
उमेश सातत्याने पावरप्ले मध्ये विकेट घेतोय. आजच्या सामन्यातही हेच दिसून आलं. उमेश यादवने आज मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माची विकेट घेतली. रोहित शर्माचा सध्या धावांसाठी संघर्ष सुरु आहे. त्याच्यावर टीमच्या प्रदर्शनाचाही दबाव दिसतोय. आज उमेश यादवची गोलंदाजी खेळताना रोहितचा संघर्ष सुरु होता. केकेआरकडून उमेशने पहिलं षटक टाकलं. त्यावेळी त्याने रोहितला भरपूर सतावलं. त्यानंतर उमेशने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितला आऊट केलं.
उमेशची गोलंदाजी खेळताना रोहित शर्मा अनेकदा अडचणीत आला. अखेर 12 चेंडूत तीन धावा करुन रोहित आऊट झाला. उमेशने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण हवेत उंच उडालेला झेल सॅम बिलिंग्सने मागे धावत जाऊन पकडला. उमेश यादवने आयपीएलमध्ये पाचव्यांदा रोहित शर्माला आऊट केलं.
Two GOATs in one frame ?@y_umesh #KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 pic.twitter.com/R4INTkMk5f
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
उमेश यादवचा पावरप्लेमधला हा 51 वा विकेट आहे. यंदाच्या सीजनमध्ये पावरप्लेमध्ये उमेश यादवने एक किंवा त्यापेक्षा जास्त विकेट काढल्या आहेत. त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत उमेश सर्वात पुढे आहे. उमेशने नऊ विकेट काढलेत. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात 41 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला. त्याने फक्त 13 धावा केल्या आहेत.