कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्ससाठी पुन्हा एकदा रिंकू सिंहने आपल्या खास अंदाजात मॅच फिनिश केली. आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये सोमवारी रात्री केकेआर आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी 2 रन्सची गरज होती. दबावाचा स्थिती होती. समोर अर्शदीप सिंगसारखा अनुभवी गोलंदाज होता. त्यावेळी रिंकू सिंहने कुठलीही चूक केली नाही. अर्शदीप सारख्या गोलंदाजाने टाकेलल्या चेंडूवर थेट चौकार ठोकला. अशा प्रकारे रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिला.
पंजाबच्या 180 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना केकेआरकडून नितीश राणाने (51), आंद्रे रसेल (42) आणि जेसन रॉयने (38) धावा केल्या. केकेआरने लास्ट बॉलवर विजय मिळवला. त्यांनी 5 बाद 182 धावा केल्या. या मॅचच्या विजयाचा खरा हिरो रिंकू सिंह ठरला. त्याने 10 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.
तोच टीमचा खरा संकट मोचक
15 सीजनमध्ये चेस करताना कोलकाता नाइट रायडर्सने फक्त एकदाच लास्ट बॉलवर विजय मिळवलाय. या सीजनमध्ये दोनदा असा करिश्मा झालाय. महत्वाच म्हणजे दोन्हीवेळा रिंकू सिंह क्रीजवर होता. दबावाच्या क्षणात त्याने टीमला विजय मिळवून दिला. रिंकू खऱ्या अर्थाने कोलकाता नाइट रायडर्सचा संकटमोचक आहे.
अजूनही कोलकात्याला आशा
या विजयासह केकेआरचे 10 मॅचमध्ये 10 पॉइंट्स झालेत. पंजाब किंग्सेच सुद्धा इतकेच पॉइंट झालेत. केकेआरची टीम पाचव्या आणि पंजाब किंग्सची टीम सातव्या नंबरवर आहे. केकेआर लास्ट पाच ओव्हर्समध्ये विजयासाठी 58 धावांची गरज होती. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 26 धावा हव्या होत्या. आंद्रे रसेलने आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू सॅम करनला 19 व्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले. टीमला लास्ट ओव्हरमध्ये 6 धावा हव्या होत्या. पाचव्या चेंडूवर आंद्रे रसेल रनआऊट झाला. लास्ट बॉलवर 2 रन्सची गरज होती. त्यावेळी रिंकूने टीमला विजय मिळवून दिला.